ऑनलाईन पद्धतीने वाहन विक्रीत फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 12:36 PM2019-10-09T12:36:59+5:302019-10-09T12:37:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऑनलाईन पद्धतीने दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार करणा:या एका अॅपवर जिल्ह्यातील अनेकांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ऑनलाईन पद्धतीने दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार करणा:या एका अॅपवर जिल्ह्यातील अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आह़े यातून नागरिकांची पुन्हा फसवणूक होऊ नये यासाठी पोलीस दलाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आह़े
जिल्ह्यात ऑनलाईन शॉपिंग करण्यात अनेक जणांकडून पसंती देण्यात येत आह़े यात दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदी विक्रीसाठीही अनेक जण विविध अॅपचा वापर करत आहेत़ या जुनी वाहने खरेदी विक्री करणा:या एका अॅपवर सैन्य दलातील जवान असल्याचे पुरावे देत एकाने वाहनविक्रीसाठी अनेकांना ऑफर दिली होती़ कमी किंमतीत वाहन मिळत असल्याने काहींनी अमिषाला बळी पडून बँक खात्यावर पैसे पाठवून दिल्याची माहिती समोर आली आह़े या व्यवहारानंतर त्यांना दुचाकी, चारचाकी वाहन किंवा दिलेले पैसेही परत मिळाले नव्हते यातून फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर काहींनी पोलीसांकडे माहिती दिल्याचे सांगण्यात आले आह़े
फसवणूकीच्या घटनांची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी ऑनलाईन अॅपवर खरेदीचे व्यवहार करताना नागरिकांनी सावध राहून खात्री करुनच व्यवहार करावेत असे सांगितले आह़े जिल्ह्यात ऑनलाईन पद्धतीने फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने अनधिकृत मोबाईल कॉल्सलाही नागरिकांना सामोरे जाणे टाळावे अशा सूचना पोलीस अधिक्षकांकडून करण्यात आल्या आहेत़
या प्रकारात नेमके फसवणूक झालेल्यांची संख्या नेमकी किती याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही़ पोलीसांकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याकडून फसवणूक करणा:या टोळीचा शोध घेतला जात असल्याची माहिती देण्यात आली आह़े