अक्ककुवा महाविद्यालयात ऑनलाइन व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:28 AM2021-01-18T04:28:50+5:302021-01-18T04:28:50+5:30
जिल्हा समन्वयक डॉ. माधव कदम व डॉ.बी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. भरत एन.पाटील यांच्या पुढाकाराने ...
जिल्हा समन्वयक डॉ. माधव कदम व डॉ.बी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. भरत एन.पाटील यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. विनोद राघोजी जोगदंड व सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेश्वरसिंग पाडवी व प्रा. प्रतिभा विष्णू आघारडे यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले. तसेच प्रभारी प्राचार्य डॉ. भरत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. विनोद जोगदंड यांनी केले. आभार राजेश्वरसिंग पाडवी यांनी मानले. या कार्यक्रमात २९ जणांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमासाठी डॉ.जुबेर शेख, डॉ.योगेश दूसिंग, डॉ. विजय पाटील, डॉ. मनोज मुधोळकर, प्रा. गोपाल शेंडे, प्रा. विनिश चंद्रन, प्रा. गोटू सूर्यवंशी व कर्मचारी मनीष पाटील, भगवान पाटील, अंकुश ठाकरे, प्रशांत पिंपरे, नारायण पाटील, भरत साळवे यांनी परिश्रम घेतले.