जिल्ह्यातील 171 मंडळांन ऑनलाईन परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:31 PM2019-08-31T12:31:39+5:302019-08-31T12:31:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून जिल्ह्यातील 171 मंडळांनी उत्सव साजरा करण्यासाठी ...

Online permission to 171 boards in the district | जिल्ह्यातील 171 मंडळांन ऑनलाईन परवानगी

जिल्ह्यातील 171 मंडळांन ऑनलाईन परवानगी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून जिल्ह्यातील 171 मंडळांनी उत्सव साजरा करण्यासाठी पोलीस दलाकडून परवानगी मागितली आह़े मंडळांनी ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या या अर्जावर कामकाज सुरु असून 1 सप्टेंबर्पयत संख्येत वाढ होणार असल्याचे पोलीस दलाने म्हटले आह़े          
जिल्ह्यातील नोंदणीकृत गणेश मंडळांकडून उत्सवासाठी पोलीस ठाण्यांकडून देण्यात येणारी परवानगी ही एक खिडकी योजनेतून देण्याबाबत पाठपुरावा करण्यात आला होता़ यानुसार गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात ऑनलाईन पद्धतीने परवानगी देण्यास सुरुवात करण्यात आली आह़े यंदाही पोलीस दलाच्या सिटीझन पोर्टलवर परवानगी देण्याची कारवाई सुरु केली गेली होती़  या प्रक्रियेला मंडळांनी पहिल्या दिवसापासून मंडळांनी प्रतिसाद दिला आह़े येत्या दोन दिवसात अंतिम आकडेवारी समोर येणार असून यात दीड दिवस, पाच, सात, नऊ आणि अकराव्या दिवशी विसजर्न करणा:या गणेशमंडळांची माहिती समोर येऊन त्यानुसार पोलीस बंदोबस्त, वाहतूक मार्ग व इतर बाबींचे नियोजन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आह़े 
दरम्यान पोलीस दलाकडे परवानगी घेणा:या मंडळांना वीज वितरण कंपनीकडून जोडण्या मिळण्यास अडचणी येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े कंपनीने योग्य त्या अटी शर्तीवर जोडण्या देण्याची मागणी मंडळांची आह़े जिल्ह्यातील 171 मंडळांनी केलेल्या अर्जावर पोलीस दलाने तातडीने कारवाई करत 60 मंडळांना परवानगी दिली आह़े ही सर्वच मंडळे शहरी भागातील आहेत़ शिल्लक असलेल्या 110 मंडळांच्या अर्जावर कारवाई करण्यात येत असून पोलीस अधिकारी व कर्मचारी मंडळांना भेटी देत आढावा घेत आहेत़ 
1853 पासून शहरात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला होता़ शतकी परंपरा असलेल्या मानाच्या दादा व बाबा या गणपती मंडळांचीही तयारी जोरात सुरु झाली आह़े पाठ पूजनानंतर दोन्ही मंडळांकडून काळ्या मातीपासून मूर्ती साकारायला सुरुवात झाली होती़ दोन्ही मानाच्या गणपतींच्या मूत्र्या रथावर  साकारण्यात येत आहेत़ कारागिर मूर्तीना अंतिम रूप देण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आह़े गोपाळ सोनवणे,संतोष सोनवणे, प्रकाश सोनवणे,जगदिश सोनवणे हे चौघे मूर्तिकार दादा गणपतीची मूर्ती साकारत आहेत.
दादा आणि बाबा गणपतीसोबत मानाच्या इतर गणपती मंडळांकडून तयारी करण्यात येत आह़े देखावे तयार करणा:या कारागीरांकडूनही अंतिम रुप देण्यात येत आह़े शहरातील पाच ते सहा मंडळांकडून स्वयंचलित प्रणालीवर देखावे तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होत़े 
जिल्ह्यात गेल्यावर्षी 568 मंडळांनी अधिकृतपणे नोंदणी करुन गणेश मूर्तीची स्थापना केली होती़ यंदाही ही संख्या 600 च्यावर जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आह़े दर दिवशी ऑनलाईन पोर्टलवर 50 च्या जवळपास मंडळे नाव नोंदणी करत आहेत़ येत्या दोन दिवसात मूळ आकडेवारी समोर येणार आह़े या सर्व मंडळांना पोलीस ठाणे निहाय नियुक्त पोलीस अधिकारी भेट देऊन सूचना करत आहेत़ तसेच सुरक्षा उपाय व सुविधांची पाहणी करत आहेत़ 
मोठय़ा गणेश मंडळांच्या मूर्ती मार्गस्थ होत असताना शहरातील बाजारपेठेत घरगुती गणेश मूर्तीची दुकाने सजवली जात आहेत़ शहरातील स्टेशनरोड, स्टेट बँक परिसरासह कुंभारवाडा आणि मंगळबाजारात गणेश मूर्तीची विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत़ यंदा मूर्तीच्या किमतीत ब:यापैकी स्थिरत असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आह़े विविधरंगी आकर्षक अशा लहान आकारातील गणेशमूर्तीना पसंती दिली जात आह़े 

Web Title: Online permission to 171 boards in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.