पुनर्भरण या विषयावर ऑनलाइन कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:21 AM2021-07-15T04:21:53+5:302021-07-15T04:21:53+5:30

या कार्यशाळेत महाविद्यालयाच्‍या १२५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेस राज्‍याचे भू.स.वि. यंत्रणेचे पुण्‍याचे संचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मार्गदर्शन केले, तसेच ...

Online workshop on the topic of recharge | पुनर्भरण या विषयावर ऑनलाइन कार्यशाळा

पुनर्भरण या विषयावर ऑनलाइन कार्यशाळा

Next

या कार्यशाळेत महाविद्यालयाच्‍या १२५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेस राज्‍याचे भू.स.वि. यंत्रणेचे पुण्‍याचे संचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मार्गदर्शन केले, तसेच ‘भूजल पुनर्भरण काळाची गरज’ या विषयावर नाशिकचे उपसंचालक दिवाकर धोटे यांनी संबोधित केले, तसेच उपप्राचार्य प्रा. डॉ. महेंद्र रघुवंशी यांनी ‘भूजल आणि आपण’ या विषयावर मत व्यक्त केले, तसेच हैद्राबादचे केंद्रीय भूमीजल मंडळाचे भूजल वैज्ञानिक उपेंद्र धोंडे यांनी ‘भूजल पुनर्भरणासाठी भूस्तर रचना समजून घेण्याची गरज’ या विषयावर मार्गदर्शन केले. नंदुरबारचे वरिष्ठ भूवैज्ञानिक रमेश बगमार यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले, तसेच सहायक भूवैज्ञानिक डॉ. सुजीत शिंपी यांनी ‘भूजल पुनर्भरण छतावरील पाऊस पाणी संकलन’ या विषयावर सादरीकरण करून संबंधितास तांत्रिक मार्गदर्शन केले. या ऑनलाइन कार्यशाळेच्‍या आयोजनासाठी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.ए.आर. भुयार आणि प्रा.रूपेश देवरे तसेच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या कार्यालयातील कनिष्ठ भूवैज्ञानिक योगेश पाटील यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Online workshop on the topic of recharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.