नंदुरबारातील 721 शेतक-यांनाच पीक विमा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:35 PM2018-07-06T12:35:54+5:302018-07-06T12:36:00+5:30
17 हजार शेतकरी वा:यावर : बोंडअळीचे नुकसानही नाकारले
नंदुरबार : गेल्या खरीप हंगामात 18 हजार शेतक:यांनी पीक विमा करून घेतला होता़ यातील बहुतांश शेतक:यांना बोंडअळीचा सामना करावा लागल्याने त्यांना विमा परतावा मिळण्याची अपेक्षा होती़ परंतु विमा कंपन्यांनी ही अपेक्षा धुळीस मिळवली असून 18 हजारपैकी केवळ 721 शेतक:यांना पीक विमा मंजूर झाला आह़े
एकीकडे शासनाकडून शेतकरी हितासाठी उत्पादनाला दीडपट हमीभाव देण्याचे जाहीर होत असताना जिल्ह्यातील शेतक:यांना विमा परतावा न दिला गेल्याने शेतकरी अवाक् झाले आहेत़ बोंडअळीसह अल्पपजर्न्यामुळे पिकांचे सातत्याने नुकसान झाल्याचे सव्रेक्षण समोर येऊनही विमा कंपन्यांनी शेतक:यांना विमा परतावा देण्यात कंजुषी केल्याचे दिसून आले आह़े
शेतक:यांना कर्ज वितरण करत असतानाच विम्याच्या नावाखाली रक्कम कपात करून बँका शेतक:यांना लुबाडत असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े नैसर्गिक आपत्तीत नुकसान होऊनही विमा परतावा न मिळाल्याचा परिणाम यंदाच्या पीक विम्यावर होत असून शेतकरी विमा नसलेल्या पिकांच्या नावाने कर्ज उचलून विमा रक्कम कपातीच्या धोरणातून स्वत:ची सुटका करून घेत आहेत़
शासनाकडून आलेले बोंडअळी नुकसानीचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने विमा परतावा मिळेल या प्रतीक्षेत असलेल्या शेतक:यांच्या अपेक्षा धुळीस मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आह़े विमा कंपन्यांकडून कमीत कमी शेतक:यांना दिलेल्या पीक विमा परताव्याचा परिणाम आता दिसून येत आह़े पीक विमा करून कोणत्याही प्रकारचा लाभ होत नसल्याचे गृहीत धरून शेतकरी विमा नसलेल्या पिकांच्या नावाने कर्ज घेत आह़े हे कर्ज घेण्यामागे शासन आणि बँका यांचे अडेलतट्ट धोरणही कारणीभूत आह़े ज्वारी, बाजरी, कडधान्य, सोयाबीन, तेलबिया पिके यांना कर्जाच्या 2 टक्के पीक विमा, तर कापसासाठी कर्ज घेतल्यावर कर्जातून पाच टक्के रक्कम कापली जात़े यातून गरजा पूर्ण होत नसल्याने शेतक:यांनी हा मार्ग पत्करला आह़े
जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त 85 हजार शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरत होत़े परंतु विमा कंपनीकडून कापूस उत्पादकांना एक रुपयाही देण्यात आलेला नाही़ बोंडअळी हे नैसर्गिक आपत्तीत मोडत असल्याने शेतक:यांना त्यानुसार हेक्टरी सात हजार किंवा उत्पादन खर्चाच्या कमीत कमी 30, तर जास्तीत जास्त 60 टक्के भरपाई देणे अपेक्षित होत़े परंतु एकाही शेतक:याचा यात समावेश करण्यात आला नाही़ कृषी विभागाने बोंडअळीवर उपाययोजना करणे शक्य असल्याने विमा कंपन्यांनी कारवाई केली नसावी असे उत्तर देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आह़े गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यातील 18 हजार 230 शेतक:यांना पीक विम्यात समाविष्ट करण्यात आले होत़े यातून 2 कोटी 78 लाख 97 हजार 326 रुपयांची रक्कम बँकांमध्ये जमा झाली होती़ शेतक:यांच्या पीक कर्जातून ही रक्कम कपात करण्यात आली होती़ यानंतर विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शेतशिवारात जाऊन पिकांचे सव्रेक्षण करून सात वर्षाच्या सरासरीनुसार आलेले उत्पादन आणि नुकसान यांची माहिती गोळा केली होती़ यातून ब:याच शेतक:यांची पिके ही नुकसानग्रस्त झाल्याचे समोर आले होत़े एकूण 18 हजार 230 शेतक:यांच्या पिकांचे सव्रेक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित विमा कंपन्यांनी केवळ 721 शेतक:यांना पात्र ठरवत त्यांना 16 लाख 62 हजार रुपयांचा परतावा दिला आह़े यात एकही कापूस उत्पादक शेतकरी नाही़ विमा कंपन्यांनी उडीद, भुईमूग या उत्पादनांना विमा रक्कम दिली आह़े यात विमा रक्कम मिळालेले सर्व 721 शेतकरी शहादा, अक्कलकुवा, नवापूर, धडगाव आणि तळोदा तालुक्यातील असल्याची माहिती आह़े
रब्बी हंगामात 347 शेतक:यांनी आठ लाख 64 हजार रुपयांचा पीक विमा केला होता़ यात काही शेतक:यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला होता़ या शेतक:यांची परताव्याची प्रतीक्षा कायम आह़े