११ निवडणुकांमध्ये केवळ चारच महिलांनी केली उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:08 AM2019-03-25T11:08:52+5:302019-03-25T11:09:21+5:30

नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात गेल्या ११ निवडणुकांमध्ये केवळ चारच महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. त्यातही एका महिला उमेदवाराने ...

Only four women candidates in the 11 elections | ११ निवडणुकांमध्ये केवळ चारच महिलांनी केली उमेदवारी

११ निवडणुकांमध्ये केवळ चारच महिलांनी केली उमेदवारी

Next

नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात गेल्या ११ निवडणुकांमध्ये केवळ चारच महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. त्यातही एका महिला उमेदवाराने दोन वेळा नशीब अजमवले आहे. गेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या डॉ.हिना गावीत या दुसऱ्यांदा नशीब अजमावत आहेत.
एकीकडे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण मिळाले आहे. लोकसभा व विधानसभेत देखील आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. असे असतांना महिलांकडून उमेदवारी करण्याची संख्या मात्र अगदीच बोटावर मोजण्याइतकी अर्थात एक आकडी आहे. आधीपासूनच अनुसूचित जमाती अर्थात आदिवासी राखीव आहे. पहिल्या निवडणुकीपासून चार पेक्षा अधीक उमेदवारांनी भाग्य अजमविण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वाधिक ९ उमेदवार २००९ च्या निवडणुकीत होते. आतापर्यंत एकुण ५४ मतदारांनी भाग्य अजमवले आहे. त्यात केवळ तीन निवडणुकीत महिलांनी उमेदवारी केली आहे. दोन वेळा माकपच्या भुरीबाई शेमळे या रिंगणात होत्या. भुरीबाई शेमळे यांनी १९८० व १९९९ च्या निवडणुकीत उमेदवारी केली होती. तर गेल्या अर्थात २००९ च्या निवडणुकीत बबीता पाडवी व मंजुळाबाई कोकणी या दोन महिला उमेदवारांनी नशीब अजवमले होते.
गेल्या अर्थात २०१४ च्या निवडणुकीत भाजपा तर्फे डॉ.हिना गावीत यांनी उमेदवारी करून विजय मिळविला होता.१९८० मध्ये भुरीबाई मानसिंग शेमळे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांना १६ हजार २४६ मते मिळाली होती.
१९९९ मध्येही माकपातर्फे भुरीबाई शेमळे यांनी निवडणूक लढवली. त्यात त्यांना १३ हजार ६२५ मते मिळाली होती.
२००९ मध्ये मंजुळाबाई सखाराम कोकणी यांनी भारिप बहुजन महासंघातर्फे निवडणूक लढवली होती. त्यांना सहा हजार ४३१ मते मिळाली होती.
गेल्या अर्थात २०१४ मध्ये भाजपातर्फे डॉ.हिना गावीत यांनी उमेदवारी करून विजय मिळविला. त्यांनी एकुण पाच लाख ७९ हजार ४८६ मते मिळविली होती.

Web Title: Only four women candidates in the 11 elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.