केवळ साडेनऊ हजार शेतक:यांनी केला ‘विमा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 11:32 AM2019-08-07T11:32:01+5:302019-08-07T11:32:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दोन दिवस मुदतवाढ मिळाल्यालेल्या पिक विमा योजनेत नव्याने केवळ 3 हजार शेतक:यांची भर पडली ...

Only one and a half thousand farmers: made 'insurance' | केवळ साडेनऊ हजार शेतक:यांनी केला ‘विमा’

केवळ साडेनऊ हजार शेतक:यांनी केला ‘विमा’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दोन दिवस मुदतवाढ मिळाल्यालेल्या पिक विमा योजनेत नव्याने केवळ 3 हजार शेतक:यांची भर पडली आह़े यातून जिल्ह्यात अंतिम मुदतीर्पयत 9 हजार शेतक:यांनी विमा करुन घेतला असून 10 हजार हेक्टर क्षेत्राला विम्याचे कवच मिळाले आह़े    
जिल्ह्यात गत पाच वर्षात प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग  घेऊनही शेतक:यांना भरपाई मिळत नव्हती़ मोजक्याच शेतक:यांना भरपाई देण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती़ सलग दोन वर्षे तीव्र दुष्काळ निर्माण होऊनही शेतक:यांना भरपाई न मिळाल्याने रोष व्यक्त करण्यात येत होता़ यातून यंदा पीक विमा करावा किंवा कसे याबाबत शेतकरी विचाराधीन होत़े 30 जुलै अंतिम मुदत असल्याने शेतक:यांनी पीक विमा करण्याचे वारंवार कृषी विभागाकडून सांगण्यात येत होत़े परंतू भरपाईच मिळत नसल्याने शेतक:यांनी योजनेत सहभागी होण्याबाबत अनुकुलता दर्शवलेली नसल्याने विमाधारक शेतक:यांची संख्या ही केवळ 9 हजारांर्पयत मर्यादित राहिली आह़े यातील प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे जिल्ह्यातील शेतक:यांना कजर्वितरण करणा:या राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकेच्या कजर्दारांपेक्षा बिगर कजर्दारांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आह़े 

नंदुरबार जिल्ह्यात 2019-20 या वर्षात 30 जुलैर्पयत 2 हजार 694 कजर्दार तर 3 हजार 784 बिगर कजर्दार शेतक:यांनी पिकविमा करवून घेतला होता़ एकूण 6 हजार 482 शेतक:यांनी 1 कोटी 19 लाख 80 हजार 328 रुपयांचा भरणा केला होता़ यातून केवळ 7 हजार 46़46 हेक्टर क्षेत्र संरक्षित होत़े शासनाने तातडीने दोन दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर योजनेत शेतक:यांची संख्या वाढणार अशी अपेक्षा व्यक्त होत होती़ यात केवळ 3 हजार 313 ेशेतकरी नव्याने जोडले गेले आहेत़ मुदतवाढीनंतर जाहिर झालेल्या आकडेवारीनुसार नंदुरबार जिल्ह्यात 4 हजार 411 कजर्दार तर 5 हजार 385 बिगर कजर्दार शेतक:यांनी खरीप पिकांचा विमा करुन घेतला आह़े एकूण 9 हजार 796 शेतक:यांकडून 1 कोटी 67 लाख 38 हजार 520 रुपयांची रक्कम विम्यापोटी जमा झाली आह़े यातून 10 हजार 306 हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आह़े यात शासनाने 8 कोटी 12 लाख 53 हजार रुपये अनुदान देत विमा कंपनीकडे 36 कोटी 82 लाख रुपयांचा भरणा केल्याची माहिती आह़े 

एकीकडे विमाधारक शेतक:यांची संख्या आणि संरक्षित विमा क्षेत्र मर्यादित असताना दुसरीकडे जिल्ह्यातील निर्धारित क्षेत्रापैकी 92 टक्के क्षेत्रात पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत़ एकूण 2 लाख 57 हजार 870 हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्या आजअखेरीस पूर्ण झाल्या आहेत़ यात नंदुरबार 55 हजार 977, नवापुर 52 हजार 946, शहादा 69 हजार 107, तळोदा 20 हजार 779, धडगाव 18 हजार 555 तर अक्कलकुवा तालुक्यात 40 हजार 515 हेक्टर क्षेत्रात पिकपेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ तब्बल अडीच लाख हेक्टर क्षेत्रात पिकांचे क्षेत्र विस्तारले असल्याने त्या तुलनेत केवळ 10 हजार हेक्टर क्षेत्राला विमा संरक्षण मिळाल्याने अनेक प्रश्न समोर येत आह़े बँकांकडून कर्ज वितरणावेळी विमा करण्यासाठी जागृती न झाल्याने तसेच राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज वाटपात दिरंगाई केल्यानेही विमाधारकांची संख्या वाढलेली नसल्याचे सांगण्यात येत आह़े शेतक:यांनी यंदा बँकांकडून कर्ज घेताना विमा नसलेल्या पिकाच्या नावाने कर्ज घेतल्याचे बॅंकाचे म्हणणे आह़े जिल्ह्यात अद्यापही राष्ट्रीयकृत बँकांची कर्ज वितरण प्रणाली संथ गतीने सुरु असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े यातून 32 टक्के शेतक:यांना बँकांनी कर्ज दिल्याची माहिती आह़े 
 

Web Title: Only one and a half thousand farmers: made 'insurance'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.