गॅस टँकर उलटल्याने नवापूरात एकच धावपळ

By admin | Published: January 18, 2017 11:34 PM2017-01-18T23:34:59+5:302017-01-18T23:34:59+5:30

सुदैवाने गळती नाही : रात्री उशिरार्पयत टँकर काढण्याचे काम सुरू, रहदारी सुरळीत

The only runway in the new era by reversing the gas tanker | गॅस टँकर उलटल्याने नवापूरात एकच धावपळ

गॅस टँकर उलटल्याने नवापूरात एकच धावपळ

Next


नवापूर : घरगुती वापराचे इंधन वाहून नेणारा गॅस टँकर उलटल्याने काही काळ धावपळ उडाली होती. सुदैवाने टँकरमधून गॅस लिक न झाल्याने मोठी दुर्घटना टळली. शहर हद्दीत रेल्वेगेटनजीक हा अपघात बुधवारी दुपारी घडला.
शहरापासून एक किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. सुरतकडून नागपूरकडे भरधाव जाणारा गॅस टँकर (क्रमांक एमएच 16- एच 4256) दुपारी अचानक उलटला. टँकरमध्ये गॅस असल्यामुळे नागरिकांसह प्रशासनाचीही धावपळ उडाली. तातडीने अगिAशमन दलाला पाचारण करण्यात आले. तहसीलदार प्रमोद वसावे, पोलीस निरीक्षक रामदास पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून गॅस लिक होत नसल्याची खात्री केली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.  सायंकाळी शिरपूर व साक्री येथून क्रेन मागविण्यात आल्यानंतर उलटलेला टँकर काढण्याचे काम सायंकाळी सुरू करण्यात आले. जवळच रेल्वे फाटक असल्यामुळे व ते वारंवार बंद होत असल्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागत होत्या. त्यामुळे टँकर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत          होती. स्थानिक पोलिसांनी वाहनांची रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी प्रय} केले.
अपघातग्रस्त टँकरमधून गॅस लिक होऊ नये व झालाच तर उपाययोजना म्हणून नवापूर पालिकेचा अगिAशमन बंब घटनास्थळी तैनात करण्यात आला होता. रात्री उशिरार्पयत टँकर काढण्याचे काम सुरू होते.
या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून अपघात घडला त्या ठिकाणीच सकाळी उभ्या ट्रकवर लहान चारचाकी टेम्पो ठोकला गेला. तर सावरट येथील दुचाकी स्वारांच्या वाहनालाही त्याच ठिकाणी अपघात झाला. त्यात एकजण जखमी झाला. गेल्या काही दिवसातील अपघातांचे प्रमाण पहाता हे ठिकाण अपघातप्रवण क्षेत्र झाले आहे.
        (वार्ताहर)

Web Title: The only runway in the new era by reversing the gas tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.