रनाळे येथे खत विक्री केंद्राचे उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:05 PM2019-06-24T12:05:18+5:302019-06-24T12:05:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील रनाळे येथे शेतकरी सहकारी संघातर्फे गोडावून आणि खत खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आल़े ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील रनाळे येथे शेतकरी सहकारी संघातर्फे गोडावून आणि खत खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आल़े यामुळे पूर्व भागातील 50 गावातील शेतक:यांची सोय होणार आह़े
केंद्राचे उद्घाटन एनटीव्हीएसचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील, उपाध्यक्ष श्रीराम पाटील, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख दीपक गवते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश गावीत, बांधकाम सभापती दत्तू चौरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवमन पवार, उपसभापती हरिश्चंद्र पाटील, अभियंता अनिल पाटील, संचालक सुरेश शिंत्रे, सुनील पाटील, भरत राजपूत, राकेश रोहिदास राठोड , विलास पाटील, राजेंद्र पाटील, पुंजाभाई पाटील, नवीन बिर्ला यांच्यासह शेतकरी उपस्थित होत़े
तालुक्याच्या पूर्व भागातील 50 गावांमध्ये खरीप हंगामादरम्यान खत खरेदीसाठी शेतक:यांची मोठी धावपळ होत होती़ खत खरेदीनंतर वाहतूकीसाठी खर्च करावा लागत होता़ यातून त्यांना आर्थिक झळही बसत होती़ शेतक:यांची ही समस्या ओळखून आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासमोर रनाळे येथे खत खरेदी केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव खरेदी विक्री संघाने ठेवला होता़ प्रस्तावासाठी आमदार रघुवंशी यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन मंजूरी मिळवून दिली़
तालुक्यात कोपर्ली आणि खोंडामळी या ठिकाणी संघाची दोन खरेदी केंद्र सुरळीत सुरु आहेत़
यशस्वीतेसाठी व्यवस्थापक आनंदराव पाटील, कृष्णा पाटील, जगन खेडकर, जितेंद्र पाटील, शाणाभाऊ पाटील, चंद्रकांत पाटील, संदीप पाटील, वाल्मीक शिंदे, विजय कडकडे, विरेंद्र पवार, संतोष पाटील, हिंमत पाटील, चंद्रकांत मराठे, शत्रुघA मोरे यांनी परिश्रम घेतले.