वृक्ष लागवड मोहिमेचे ठाणेपाडय़ात उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:22 PM2019-07-02T12:22:07+5:302019-07-02T12:22:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 33 कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या हस्ते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : 33 कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या हस्ते ठाणेपाडा येथे करण्यात आला. जिल्ह्यात यंदा 94 लाख रोपांची लागवड करण्यात येणार आह़े
यावेळी पोलीस अधिक्षक संजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय भांगरे, उपवनसंरक्षक एस.बी.केवटे, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी ए.के. धनापुणे, तहसीलदार बाळासाहेब थोरात, सहायक वनसंरक्षक जी.आर.रणदिवे, सरपंच भारती पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवमन पवार यांच्यासह विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ठाणेपाडा येथे 27 हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. वृक्षारोपण मोहिम शुभारंभानंतर प्रशासकीय अधिका:यांनी वन विभागाच्या रोपवाटीकेस भेट देऊन माहिती घेतली. येत्या 30 सप्टेंबर्पयत जिल्ह्यात वृक्षारोपण सुरु राहणार आह़े सहा हजार 600 ठिकाणी यंदा 94 लाख 59 हजार खड्डय़ात रोपांची लागवड होणार आह़े
जिल्ह्यात यावर्षी वन विभाग 47 लाख तर सामाजिक वनीकरण विभाग सुमारे 23 लाख रोपांची लागवड करणार आहे. कृषी विभाग 2 लाख 92 हजार तर ग्रामपंचायतस्तरावर 18 लाख 50 हजार रोपांची लागवड करणार आह़े राज्य शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत यंदा राज्यात 33 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्याला 91 लाख 44 हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होत़े परंतू प्रशासनाने वाढीव उद्दीष्टय़ स्विकारत 94 लाख 58 हजार रोपे लावण्याचे नियोजन केले आह़े