डेंग्यू निर्मूलनासाठी जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे ऑपरेशन क्लीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:32 AM2021-09-27T04:32:41+5:302021-09-27T04:32:41+5:30
दरम्यान ज्या ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. अशा कुटुंबांची आरोग्य तपासणी केली जात आहे. या कुटुंबांसाठी स्वतंत्र वैद्यकीय ...
दरम्यान ज्या ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. अशा कुटुंबांची आरोग्य तपासणी केली जात आहे. या कुटुंबांसाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्त करत त्यांची वेळोवेळी तपासणी केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यातून एकापेक्षा अधिक जणांना डेंग्यूची लागण झाली किंवा कसे याचा शोधही घेतला जाणार आहे.
दरम्यान जिल्ह्यात शहादा आणि धडगाव तालुक्यात डेंग्यूचा फैलाव आहे. शहादा शहर व ग्रामीण भागात तसेच धडगाव तालुक्यात रुग्णांची संख्या ही वाढल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप आकडेवारी स्पष्ट करण्यात आली नसली तरी सात ते आठ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचा अंदाज आहे.
याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी महेंद्र चव्हाण यांनी सांगितले की, जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळून आल्यानंतर तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. ज्या ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. अशा गावांमध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. याठिकाणी आरोग्य पथक जाऊन कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करत आहे.