प्रस्तावित वनकाद्याला सत्यशोधक सभेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:39 PM2019-06-27T12:39:30+5:302019-06-27T12:39:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : 2019 चा प्रस्तावित वनकायद्यास विरोध दर्शवून हा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी  सत्यशोधक ...

Opposed to the proposed verdict Satyashodhak Sabha | प्रस्तावित वनकाद्याला सत्यशोधक सभेचा विरोध

प्रस्तावित वनकाद्याला सत्यशोधक सभेचा विरोध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : 2019 चा प्रस्तावित वनकायद्यास विरोध दर्शवून हा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी  सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेकडून करण्यात आली.       
सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या असंख्य महिला पुरुषांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करुन तहसीलदार सुनिता ज:हाड यांना निवेदन दिले. 
निवेदनात म्हटले आहे की, वन कायदा 2019 हा नवीन वन कायदा आदिवासी वनहक्क कायदा 2006, 2008 व सुधारीत अधिनियम 2012 नुसार वन हक्क दावेदारांना जंगल जमीनीवरील मिळालेले अधिकार नाकारत आहे. केंद्रशासन व राज्य सरकारचा आदिवासींना वनहक्क कायद्यानुसार मिळालेले अधिकार डावलून बहुराष्ट्रीय कंपन्यांना जमिनी विकण्याचा हेतू दिसत आहे. त्यामुळे प्रस्तावित वन कायदा 2019 हा आदिवासींना मिळणा:या हक्का विरोधी आहे, असा आरोप करून वन कायदा 2019 ताबडतोब रद्द व्हावा,  सर्व शेतक:यांचे वीज बिल सहीत सर्व कर्ज माफ करावे, सर्व शेतक:यांना पीक कर्जाचे ताबतोब वाटप करण्यात यावे,  वन हक्क कायदा 2006 व नियम 2008 व सुधारणा अधिनियम 2012 नुसार दावा दाखल दावेदारांचा पिकपेरा तलाठय़ांमार्फत अद्ययावत रजिस्टर मध्ये नोंद करुन दुष्काळ निधी देण्यात यावे, पिण्याचा पाण्याचा तुटवडा लक्षात घेता सर्व धरणातील पाणी राखीव ठेवण्यात यावे,  दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता गरजू कुटुंबांना तात्काळ जीवनावश्यक वस्तूंची सुविधा उपलब्ध करावी, गुंरासाठी चारा व छावण्या जिल्हय़ात  उभारण्यात याव्यात. जिल्हयातून परजिल्हय़ात चारा विक्रीला बंदी घालावी, दुष्काळग्रस्त यादीत नाव नसलेल्या उर्वरीत प्रलंबित वनहक्क शेतक:याला पीक नुकसान भरपाई त्वरीत द्यावी, दुष्काळग्रस्त शेतक:यांना पीक नुकसान भरपाई देण्यात यावी, या सारख्या अनेक मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. 
निवेदनावर रामसिंग गावीत, जगन गावीत, होमाबाई गावीत, दिलीप गावीत, रणजित गावीत, रामा गावीत, मंगा गावीत, नकटया गावीत, जोत्या गावीत, गेवाबाई गावीत, जेका गावीत, कांतीलाल गावीत, रमेश गावीत, नवग्या गावीत, राजु सैदाने, भिलक्या गावीत, प्रभाकर गावीत, सयाजी गावीत, गेमजी गावीत, जयसिंग गावीत, जालमसिंग गावीत, सिंगा वळवी आदींच्या सह्या आहेत.
या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नासीर पठाण, पो.का निजाम पाडवी, मोहन साळवे, प्रशांत यादव, यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Opposed to the proposed verdict Satyashodhak Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.