अक्कलकुवा तालुक्यातून विरोध : शेतक:यांची भूसंपादनावर हरकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:26 PM2018-01-29T12:26:46+5:302018-01-29T12:26:51+5:30

Opposition from Akkalkuwa Talukas: Farmers: Their Land Acquisition | अक्कलकुवा तालुक्यातून विरोध : शेतक:यांची भूसंपादनावर हरकत

अक्कलकुवा तालुक्यातून विरोध : शेतक:यांची भूसंपादनावर हरकत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : तालुक्यातील 11 गावांच्या ग्रामस्थांनी ब:हाणपूर-अंकलेश्वर आणि नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी जमिनी देण्यास शेतक:यांनी नकार दिला आह़े याबाबतचे निवेदन शेतक:यांनी जिल्हाधिकारी यांना दिले असून महामार्गासाठी जमिन जाणा:या 54 शेतक:यांनी ही हरकत नोंदवली आह़े 
तळोदा तालुक्यातील 148 शेतक:यांनी जमिन हस्तांतरणास विरोध दर्शवला होता़ या पाश्र्वभूमीवर आता अक्कलकुवा तालुक्यातील शेतकरी पुढे आले आहेत, डोडवा, गव्हाळी, नवापाडा, उमरकुवा, पेचरीदेव, टावली, खडकुना, डोंगरीपाडा, गुलीउंबर, उदेपूर, कोराई या 11 गावातील शेतक:यांनी जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन दिले असून मातीमोल दरांमध्ये जमिन देण्यास नकार दिला आह़े शासन जमिन हस्तांतरणाच्या नावाखाली आदिवासी शेतक:यांना भूमिहीन करण्याचा कट करत असल्याचा आरोपही निवेदनाद्वारे करण्यात आला आह़े अखिल भारतीय आदिवासी महासंघ आणि शिवसेना यांनीही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आह़े आदिवासी शेतक:यांना योग्य त्या प्रकारे जमिनीचा मोबदला देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आह़े निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी, जी़डी़पाडवी, टावली ग्रामपंचायत सरपंच वसंत हुरजी पाडवी, रूबजी गोमा पाडवी, रामचंद्र जेह:या वसावे, टेडग्या भाग्या वसावे, खेत्या खात्र्या वसावे, तालजी खात्र्या वसावे, आत्माराम सु:या वसावे, जेमू भागा वसावे, मगन शेतू वसावे, दिल्या बोदा वसावे, टेडग्या माग्र्या वसावे, पुन्या बोंदा वसावे, फोताबाई साक:या वसावे, गेनाबाई सु:या वसावे, गोवलीबाई पोहल्या वसावे, प्रभू भामटय़ा वसावे, येमा फुलजी वसावे, आदी 59 शेतक:यांच्या सह्या आहेत़ 
 

Web Title: Opposition from Akkalkuwa Talukas: Farmers: Their Land Acquisition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.