नंदुरबारातील महामोर्चाद्वारे धनगर आरक्षणाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 03:28 PM2019-03-09T15:28:37+5:302019-03-09T15:28:43+5:30

धनगर आरक्षणासंदर्भात रिट याचिकेत प्रतिज्ञापत्रही दाखल करणार आहे़

Opposition to Dhangar reservation by the Nandurbar rally | नंदुरबारातील महामोर्चाद्वारे धनगर आरक्षणाला विरोध

नंदुरबारातील महामोर्चाद्वारे धनगर आरक्षणाला विरोध

Next

नंदुरबार : केंद्राकडे धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या यादीत स्थान द्यावे अशी शिफारस राज्य सरकार करणार आहे़ तसेच मुंबई उच्च न्यायालयात धनगर आरक्षणासंदर्भात रिट याचिकेत प्रतिज्ञापत्रही दाखल करणार आहे़ सरकारने हे दोन्ही निर्णय मागे घ्यावेत या मागणीसाठी नंदुरबार येथे आदिवासी बचाव महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते़ यात शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले़
शुक्रवारी दुपारी १२ वाजता महाराणा प्रताप पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली़ नेहरु चौक, जुनी नगरपालिका चौक, शास्त्री मार्केट, माणिक चौक, सोनार खुंट या मार्गाने साक्री नाका परिसरातील बाबासाहेब पुतळा येथून हा मोर्चा नवापूर चौफुलीकडे निघाला़ नवापूर चौफुलीवरुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देत सभा घेण्यात आली़
सभेस माजीमंत्री अ‍ॅड पद्माकर वळवी, राष्ट्रीय आदिम जनजातील विचार मंचचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, ज्येष्ठ साहित्यिक वाहरु सोनवणे, माजी आमदार डॉ़ नरेंद्र पाडवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, डॉ़ भरत वळवी, आदिवासी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीषकुमार नाईक, नंदुरबार पालिका सभापती कुणाल वसावे, आदिवासी महासंघाचे आमशा पाडवी, डॉ़ राजेश वळवी, भिमसिंग वळवी, वासुदेव गांगुर्डे, मालती पाडवी, दिपा वळवी, नामदेव पटले, मोहन शेवाळे, माजी सभापती सीक़े़पाडवी, वासुदेव गांगुर्डे, अर्जुनसिंग वसावे, रविंद्र पाडवी, प्रमोद नाईक, सुवर्ण नाईक, निलेश पाडवी, करणसिंग तडवी, रविंद्र मुसळदे, विनोद माळी, सुरेश मोरे, ज्ञानेश्वर ठाकरे, प्रमोद गायकवाड, मालती वळवी, अंजू पाडवी, डॉ़ जर्मनसिंग पाडवी, अ‍ॅड़ कैैलास वसावे, डॉ़ योगेश वळवी, पंडीत तडवी, जगदीश वळवी, दत्तू भिल, विक्रमसिंग वळवी यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते़ प्रारंभी ज्येष्ठ साहित्यिक वाहरु सोनवणे यांन मार्गदर्शन केले़
माजीमंत्री अ‍ॅड़ वळवी यांनी आदिवासींच्या अस्तित्त्वाचा हा मोर्चा आहे़ मुख्यमंत्री आदिवासींचे वैरी असल्यासारखेच वागत आहेत़ धनगर समाज आर्थिकदृष्ट्या सधन असताना त्यांना आरक्षण देणे चुकीचे आहे़ आदिवासी समाजाने आता कायद्याची लढाई लढणे गरजेचे आहे़
राजेंद्रकुमार गावीत यांनी आदिवासींना आरक्षणाविरोधात एकत्र लढा द्यावा लागेल़ जातीयवादी सरकारच्या निर्णयांमुळे नुकसान होत असून हा निर्णय हा आदिवासीविरोधी असल्याचे सांगितले़
शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले़ निवेदनात धनगर समाज आरक्षणाचा निर्णय रद्द करावा, डिबीटी तात्काळ रद्द करावी, वनदाव्यांना मंजुरी, आदिवासी आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे, बोगस आदिवासींवर कारवाई करावी, आदिवासींचा राखीव निधी इतर कोणालाही देवू नये आदी मागण्या करण्यात आल्या़
मोर्चात आदिवासी एकता परिषद, आदिवासी हक्क संरक्षण समिती, राष्ट्रीय आदिम जनजाती विचार मंच, आदिवासी महासंघ, आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन, आदिवासी मौखिक साहित्य परिषद, डोंगऱ्यादेव माऊली संघर्ष समिती, आदिवासी पावरा बारेला समाज, भिल्लीस्थान विकास मोर्चा, आदिवासी टायगर सेना, कोकणी-कोकणा महासंघ, भिल्लीस्थान टायगर सेना आदी संघटनांचा सहभाग होता़

Web Title: Opposition to Dhangar reservation by the Nandurbar rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.