विसरवाडीत महामार्ग चौपदरीकरणास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:34 PM2018-01-18T12:34:53+5:302018-01-18T12:35:06+5:30

Opposition to the four-lane highways in the forgettaking highway | विसरवाडीत महामार्ग चौपदरीकरणास विरोध

विसरवाडीत महामार्ग चौपदरीकरणास विरोध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी  : नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावातून जाणा:या धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदीकरणाचे काम सुरू झाले आह़े यात विसरवाडी गावातील काही घरे आणि दुकाने काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एकच गहजब उडाला आह़े कोणतिही पूर्वसूचना न देता महामार्ग प्राधिकरणने घरे पाडण्याची कारवाई हाती घेतल्याने नाराजी व्यक्त होत आह़े   
गेल्या काही वर्षात विसरवाडी गावाच्या मध्यातून जाणा:या धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या दोन्ही बाजूस मोठय़ा प्रमाणावत बांधकामे झाली आहेत़ यातील काही बांधकामे ही ग्रामपंचायतीच्या परवानगीने तर निवडक बांधकामे ही रस्त्यार्पयत वाढली आहेत़ यात अनेकांची घरे आहेत़ 30 वर्षापेक्षा अधिक कालावधीच्या या घरांचे आणि दुकानांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई मंगळवारपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून सुरू करण्यात आले होत़े कोणतिही पूर्वसूचना न देता अतिक्रमण काढण्याच्या या कारवाईला दुकानदार आणि ग्रामस्थ यांनी विरोध केल्यानंतर हे काम थांबवण्यात आल्याचे सांगण्यात आले आह़े यासाठी ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारे ना-हरकत दाखला किंवा नोटिसा देण्यात आलेल्या नसल्याने यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आह़े ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांनी अतिक्रमण काढण्याचे काम थांबवण्याच्या मागणीचे निवेदन बुधवारी सकाळी पोलीस निरीक्षकांना दिले आह़े साधारण 30 वर्षापेक्षा अधिक जुन्या असलेल्या घरे आणि दुकानांना आधी मोबदला आणि मग नोटीस त्यानंतरच घरे पाडणे किंवा दुकान हटवण्याची कारवाई करण्याचा नियम असताना, महामार्ग प्राधिकरणच्या अधिका:यांनी परस्पर ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यालगतच्या घरांचे सव्रेक्षण करून मोबदला देण्याची माहिती संबधितांना दिली होती़ मात्र रस्त्यालगतच्या इतर छोटे विक्रेते किंवा कच्ची मातीची घरे यांच्या मालकांना कोणतीही सूचना किंवा त्यांचे सव्रेक्षण केलेले नसल्याची गंभीर बाब समोर आली आह़े यातही 15 जानेवारी रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता सायंकाळी चार वाजेपासून दुकाने पाडण्यास सुरूवात केली़ यात काहींची दुकाने जमिनदोस्त झाली आहेत़ त्यांच्या साहित्याची तूटफूट होऊन नुकसान झाले आह़े या कारवाईनंतर विसरवाडी गावातील अनेकांची चांगलीच धावपळ उडाली़ मंगळवारीही कारवाई सुरू करण्यात आल्यानंतर नागरिकांनी विरोध करत आधी मोबदला आणि नंतर अतिक्रमण काढावे अशी भूमिका घेत कामाला विरोध केला़ यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच बकाराम गावीत महेश अग्रवाल, आबिद शेख यांच्यासह गावातील ज्येष्ठांनी हस्तक्षेप करत महामार्ग प्राधिकरणच्या अधिका:यांना जाब विचारला,संबधित अधिका:यांनी थातूरमातूर उत्तर दिल्याने उपस्थित सर्वानीच नाराजी व्यक्त करत, मोबदल्याशिवाय रस्त्याच्या दुर्तफा असलेल्या घरांची तोडफोड केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला़ 

Web Title: Opposition to the four-lane highways in the forgettaking highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.