केंद्र व राज्यातील सरकार मजूर, कष्टकरी व शेतक:यांचे विरोधक- भाकप अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:29 PM2018-03-10T12:29:30+5:302018-03-10T12:29:30+5:30

Opposition to government laborers, laborers and farmers in the center and the state - the CPI (M) convention | केंद्र व राज्यातील सरकार मजूर, कष्टकरी व शेतक:यांचे विरोधक- भाकप अधिवेशन

केंद्र व राज्यातील सरकार मजूर, कष्टकरी व शेतक:यांचे विरोधक- भाकप अधिवेशन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : केंद्र सरकारने प्रसार माध्यमांवर अघोषित संचारबंदी लावली असून केंद्र आणि राज्यातील सध्याचे सरकार शेतकरी, शेतमजूर आणि कष्टक:यांच्या विरोधातील असल्याचा आरोप अतुलकुमार अंजान यांनी केला़ 
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 23 वे राज्यस्तरीय अधिवेशन शुक्रवारपासून शहादा येथे सुरू झाल़े मिराप्रताप लॉन्स येथे 11 मार्चर्पयत होणा:या या अधिवेशनासाठी राज्यभरातून भाकपाचे 400 प्रतिनिधी उपस्थित झाले आहेत़ शहरातील जनता चौकात सभेपासून या अधिवेशनाची सुरूवात करण्यात आली़ भाकपाचे जिल्हा सचिव माणिक सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या सभेस राष्ट्रीय नेते अतुलकुमार अंजान, भालचंद्र कांगो, तुकाराम भस्मे, राजू देसले, श्याम काळे, उमाबाई पानसरे, शिवकुमार गणवीर, शमिम फैजी, प्रफुल्ल सेनगुप्ता, सुकुमार दामले, प्रा़ राम बाहेती, मिलींद रानडे, विश्वास उरगी, नामदेव गावडे, अॅड़ मनोहर टाकसाळ, प्रकाश रेड्डी, नामदेव चव्हाण, स्मिता पानसरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होत़े 
पुढे बोलताना अतुलकुमार अंजान म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी लोकांना स्वपAे दाखवून सत्ता मिळवली़ आह़े मोदींच्या राज्यात महागाई कमी होण्याऐवजी वाढली आह़े तरूणांना रोजगार मिळालेला नाही, नोटबंदीमुळे लाखो उद्योग बंद पडले, व्यापार कमी झाला, प्रत्येक अध्र्या तासात शेतकरी आत्महत्या करीत आह़े ग्रामीण भागात शेतकरी तर शहरात सामान्य माणूस लुटला जात आह़े देशात सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक हिंसेचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला़ सिंचनाच्या नावावर मागील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने 71 हजार कोटींची लूट केल्याचे अंजान यांनी सांगितल़े 
भालचंद्र कांगो यांनीही यावेळी राज्यातील व केंद्रातील सरकारवर तोफ डागत हे सरकार गरीबांचे नसून श्रीमंतांचे असल्याचे सांगितल़े शेतक:यांच्या मालाला भाव नाही़ कजर्माफी नाही़ सरकारने निवडणूकीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत़ राज्यातील सरकार शेतक:यांवर अन्याय करणारे आणि आदिवासी दलितविरोधी आह़े गौरी लंकेश, गोविंद पानसरे, डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडण्याचा कोणताही प्रयत्न सरकारने केले नाही़ याउलट हे सरकार सत्तेचा दुरूपयोग करत आह़े गरीबांना शिक्षणाचा, आरोग्याचा व रोजगाराचा हक्क मिळण्यासाठी भाकप प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितल़े सूत्रसंचालन ईश्वर पाटील व मोहन शेवाळे यांनी केल़े यशस्वीतेसाठी संगीता सूर्यवंशी, द्वारकाबाई गांगुर्डे, दंगल सोनवणे, बुधा पवार हे परिश्रम घेत आहेत़

Web Title: Opposition to government laborers, laborers and farmers in the center and the state - the CPI (M) convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.