निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश : आमदार चंद्रकांत रघुवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:15 PM2018-02-27T12:15:53+5:302018-02-27T12:15:53+5:30

नवापूरात तालुका काँग्रेस कमिटीची बैठक

Order for preparation of elections: MLA Chandrakant Raghuvanshi | निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश : आमदार चंद्रकांत रघुवंशी

निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश : आमदार चंद्रकांत रघुवंशी

googlenewsNext


लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 27 : काँग्रेस पक्षाची विचारधारा लोककल्याणकारी असून हे जनतेला पटवून देण्याचे कार्य प्रत्येक कार्यकत्र्याने कराव़े त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारीला लागा असे आवाहन काँग्रसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
नवापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कॉग्रेस भवन येथे सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, मार्केट कमेटी सदस्य, शेतकरी सहकारी संघाचे संचालक, नवापूर नगर पालिकेचे नगराध्यक्ष व नगरसेवक तसेच काँग्रेस पक्षाच्या विविध आघाडय़ांचे प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली.
बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री माणिकराव गावीत, नवापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भरत गावीत, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, पंचायत समिती सभापती सविता गावीत, उपसभापती दिलीप गावीत, नगराध्यक्षा हेमलता पाटील, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अजित नाईक, पालिकेचे गटनेते गिरीष गावीत, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष आर.सी. गावीत, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती विक्रम वळवी, नंदुरबारचे माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे उपस्थित होते.
सभेला मार्गदर्शन करतांना आमदार रघुवंशी यांनी यांनी सांगितले की, आताचे भाजप सरकार फक्त जाहीराती करत आहे. उपेक्षित व गरीब लोकांसाठी असलेल्या योजना, अनुदान भाजप सरकार बंद करत आहे. आता झालेल्या नवापूर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने एकजुट ठेऊन यश मिळविले. तरुणांना सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांवर कॉग्रेसचा ङोंडा फडकवा असे आवाहन त्यांनी केले.
तालुकाअध्यक्ष भरत गावीत म्हणाले की, सरपंचांनी ज्या-ज्या समस्या माडल्या, त्या सोडविण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितल़े आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक म्हणाले की, भाजप सरकार खोटी आश्वासने देऊन शेतकरी व गरीब जनतेला भुलथापा देत आहेत. कर्ज माफीचा घोळ अजूनही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. माजी केद्रीय मंत्री माणिकराव गावीत म्हणाले की, भाजपने जनतेला दिलेले आश्वासने पुर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. नोटाबंदी व जी.एस.टी मुळे लहान उद्योग धंदे बंद पडले असल्याचे सांगितल़े कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समिती उपसभापती दिलीप गावीत व आर.सी.गावीत यांनी केले तर आभार भरत गावीत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंचायत समिती सदस्य जालमसिंग गावीत, सुभाष गावीत, आयुब गावीत, अरविंद गावीत, आशिक गावीत, दत्तु गावीत, ताहीर पठाण यांनी परीश्रम घेतले.

Web Title: Order for preparation of elections: MLA Chandrakant Raghuvanshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.