अधिक मासानिमित्त नंदुरबारात हनुमान यज्ञाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:04 PM2018-05-16T13:04:31+5:302018-05-16T13:04:31+5:30
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 16 : पुरुषोत्तम मासानिमित्त (अधिक मास) समस्त जय सियाराम भक्त परिवाराकडून 16 मे ते 13 जून दरम्यान नंदुरबार येथील मोठा मारुती मंदिरात अखंड रामधुनसह विविध धार्मिक कार्यक्रमासह हनुमान यज्ञाचे आयोजन करण्यात आले आह़े संत दगा महाराजांनी 35 वर्षापूर्वी असा यज्ञ केला होता़ त्यानंतर प्रथमच असा यज्ञ होत आह़े
श्रीश्री 108 श्री महंत प़पु़ संत तारादासजी बापू व आचार्य हरिषचंद्र बाळकृष्ण जोशी यांच्या उपस्थितीत अधिक मासनिमित्त रामधुन, सत्संग, सुन्दरकांड पाठ, हनुमानयज्ञ, महाप्रसाद आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आह़े कार्यक्रमांची रुपरेषा पुढील प्रमाणे - 16 मे ते 13 जुनर्पयत सकाळी 9 वाजता अखंड रामधुन, सकाळी 8 वाजता हनुमान यज्ञ, प्रत्येक मंगळवार व शनिवारी दुपारी 4 ते सायंकाळी 6 र्पयत सुंदरकांड पाठ, प्रत्येक सोमवारी सकाळी 7 ते 9 र्पयत शिव रुद्राभिषेक, प्रत्येक दिवशी सकाळी 11 ते दुपारी दीड वाजेर्पयत व सायंकाळी 7 ते रात्री 9 र्पयत श्रॉफ हायस्कूल येथील मैदानावर महाप्रसाद, तारादासजी बापू यांचा प्रत्येक सोमवार व गुरुवारी दुपारी 3 ते 5 सत्संग व प्रवचन कार्यक्रम आदींचे आयोजन करण्यात आले आह़े 13 जून रोजीसकाळी 9 ते 11 वाजेदरम्यान पूर्णाहुती व महाप्रसाद कार्यक्रम होईल़
महिनाभरात साधारण 5 लाखांहून अधिक भाविक याचा लाभ घेतील असा अंदाज आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला आह़े महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याने आयोजकांकडून संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आली आह़े भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंसेवकांचीही नियुक्ती करण्यात आली आह़े शहरीभागासह ग्रामीण भागतूनही मोठय़ा संख्येने भाविक हनुमान यज्ञाचा लाभ घेण्यासाठी येणार असल्याचे सांगण्यात आल़े आयोजकांकडून उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आह़े