पाच गावांमध्ये विधी सेवा प्राधिकरण शिबिरांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:33 AM2021-09-21T04:33:49+5:302021-09-21T04:33:49+5:30

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा दिवाणी न्यायाधीश डी.व्ही.हरणे, विधिज्ञ सीमा यू. खत्री, शुभांगी चौधरी, एस.एस.वळवी, मनोज परदेशी ...

Organizing Legal Services Authority camps in five villages | पाच गावांमध्ये विधी सेवा प्राधिकरण शिबिरांचे आयोजन

पाच गावांमध्ये विधी सेवा प्राधिकरण शिबिरांचे आयोजन

Next

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा दिवाणी न्यायाधीश डी.व्ही.हरणे, विधिज्ञ सीमा यू. खत्री, शुभांगी चौधरी, एस.एस.वळवी, मनोज परदेशी उपस्थित होते. शिबिराप्रसंगी डी.व्ही.हरणे यांनी उपस्थितांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कामकाजाविषयी, लोक अदालत, मध्यस्थता, महिलांचे कायदे, फिर्याद, अटक व जामीन संबंधित कायदे तसेच प्राधिकरणाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. विधिज्ञ सीमा खत्री, शुभांगी चौधरी, एस.एस.वळवी, मनोज परदेशी यांनीही कौटुंबिक हिंसाचार, महिलांविषयी असणारे कायदे, वरिष्ठ नागरिकांचे अधिकार, फौजदारी स्वरूपातील कायदे, वारस प्रमाणपत्र व इतर कायद्यांविषयी मार्गदर्शन केले.

यशस्वितेसाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश वळवी, लिपिक अविनाश बर्डे, पातोंडा, कोळदा, नळवे खु., खामगाव, टोकर तलाव येथील ग्रामसेवक व सरपंच यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Organizing Legal Services Authority camps in five villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.