...अन्यथा पालिका निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:23 PM2017-11-01T13:23:52+5:302017-11-01T13:23:52+5:30
तळोद्यात नागरिकांचा एल्गार : अतिक्रमण काढण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : शहरातील मोठा माळीवाडा परिसरात गटार व रस्त्याचे बांधकाम पालिकेतर्फे सुरू करण्यात आले आह़े परंतु हे बांधकाम गल्लीतील अतिक्रमण काढल्याशिवाय करू नये अन्यथा आगामी पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकून उपोषण करण्याचा इशारा येथील नागरिकांनी निवेदनांद्वारे दिला आह़े
तळोदा शहरातील मोठा माळीवाडा परिसरात पिठाच्या बंद गिरणीपासून दुतर्फा गटारींचे व रस्त्याचे बांधकाम नगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आले आह़े या आधीसुद्धा येथील रस्त्याचे व गटारींचे काम पालिकेने सुरू केले होत़े परंतु येथील गटारीवर व रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण करून बांधकाम केले आह़े ते अतिक्रमण जैसे थे ठेवून पालिका गटार व रस्त्याचे काम करीत होती म्हणून तेव्हा येथील नागरिकांनी अतिक्रमण काढून रस्ता व गटारींचे काम करावे अशी मागणी केली असता पालिकेने कामच बंद केले होत़े तेच काम पालिकेतर्फे पुन्हा सुरू करण्यात आले आह़े परंतु अतिक्रमण जैसे थे ठेवण्यात आले आह़े त्यामुळे येथील नागरिकांनी तळोदा पालिकेचे मुख्याधिकारी यांना याबाबत निवेदन दिले आह़़े निवेदनात म्हटले आहे की, परिसरात मोठया प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आह़े या अतिक्रमणामुळे या गल्लीत कचरा संकलन करणारे ट्रॅक्टर, अग्निशमन बंब व रुग्णवाहिका येऊ शकत नसल्याने या भागात नेहमी अस्वच्छता राहत असत़े अग्नी उपद्रव झाल्यास किंवा एखाद्या रुग्ण अत्यवस्थ झाल्यास अग्निशमन बंब अथवा रुग्णवाहिका उपयोगात येत नाही तसेच चार चाकी वाहन सुद्धा जात नाही त्या मुळे अनेक छोटे मोठे वाद व समस्या निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आह़े अतिक्रमण धारकांनी गटारी व रस्त्यावर ओटे बांधून व जिने ठेवून अतिक्रमण केले आह़े त्यामुळे पालिकेने रीतसर अतिक्रमण काढावे व गटार आणि रस्त्याचे बांधकाम करावे अन्यथा येथील रहिवासी पालिकेसमोर उपोषणास बसू व आगामी पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा निवेदनात दिला आह़ेे निवेदनावर चंद्रकांत सूर्यवंशी, सतिष मगरे, महेश माळी, विलास माळी, गुलाब सूर्यवंशी, नरेंद्र सूर्यवंशी, दिगंबर सूर्यवंशी, महेंद्र सूर्यवंशी, रमेश चौधरी आदी 41 महिला व पुरुषांच्या निवेदनावर सह्या आहेत़