अन्यथा चार एकर क्षेत्रावर पेरणी नाही
By admin | Published: June 2, 2017 01:35 PM2017-06-02T13:35:58+5:302017-06-02T13:35:58+5:30
ब्राrाणपुरी येथील शेतक:याचा निर्णय
Next
ऑनलाईन लोकमत
शहादा,दि.2- शहादा तालुक्यातील प्रगत शेतक:यांचे गाव असलेल्या ब्राrाणपुरी येथील अंबालाल सुभाष पाटील यांनी शासनाच्या शेतीविषयक धोरणांचा निषेध म्हणून स्वत:च्या चार एकर शेतीमध्ये पेरणी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
1 जूनपासून सुरू झालेल्या संपात ब्राrाणपुरी गावातील सर्व शेतकरी सहभागी झाले आह़े सकाळी शेतक:यांनी गावशिवारातून जाणा:या केळीच्या गाडय़ांना थांबा देऊन संपाला सुरूवात केली होती़ तसेच बाजार समितीत धान्य न घेऊन जाण्याचा निर्णयही जाहिर केला आह़े यात अंबालाल पाटील यांनी चार एकर जमिनीत पीक पेरणी न करता, जमिन संपावर गेल्याचे जाहिर केल़े शासनाने कजर्माफी न दिल्यास पूर्ण 40 एकर जमिनीवर पीक पेरा न करण्याचा निर्णय घेतला आह़े