स्वयंभू आमचा विटेवरी उभा
By Admin | Published: July 4, 2017 12:25 PM2017-07-04T12:25:30+5:302017-07-04T12:25:30+5:30
दीड शतकी परंपरा लाभलेले विठ्ठल मंदिरवर्षभरात होते विविध कार्यक्रमांचे आयोजन
ऑनलाईन लोकमत
तळोदा, दि.4 - शहरातील मेन रोड परिसरात असलेले विठ्ठल मंदिर हे केवळ विठ्ठल मंदिर नसून या शहराचा सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक वारसा जपणारे एक केंद्र आह़े या मंदिराला तब्बल 153 वर्षाची धार्मिक परंपरा लाभली आह़े आषाढी एकादशीनिमित्त बालाजी वाडय़ातील या मंदिरात दरवर्षीप्रमाणे या वर्षीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आह़े
भाविकांच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा श्री हरी विठ्ठल अशी या मंदिराची ख्वाती आह़े त्यामुळे या मंदिरात भाविकांची नेहमीच दर्शनासाठी गर्दी असत़े शिवाय शहराच्या वेशीवर, मुख्य रस्त्यावर मारुती मंदिराला लागूनच बालाजी वाडय़ात हे टुमदार मंदिर आह़े त्यामुळे रोज सकाळी गावातील नागरिक मारुती मंदिराबरोबरच विठ्ठल मंदिरातही येऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत असतात़ या मंदिराच्या सभामंडपात सभा, विविध संमेलने, सामाजिक, सांस्कृतिक कार्य, बैठका होत असतात़ विविध सामाजिक कार्यक्रमांबरोबरच नर्मदा परिक्रमा करणा:या भाविकांसाठीही हे मंदिर व बालाजी वाडय़ाच्या परिसरात निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असत़े 153 वर्षाच्या या पुरातन मंदिराचा अतिशय जीर्ण झाल्याने 2014 मध्ये भाविकांच्या अर्थसाह्याने जीर्णोद्धार करण्यात आला होता़ मंदिराचा गाभा, मूर्ती व इतर बाबीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही़ तळोदा येथील वडाळकर हे बंधू मंदिराची देखभाल करीत आहेत़
मूळचे अहमदनगर जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या वडाळकर परिवाराने 153 वर्षापूर्वी तळोदा शहरात आश्रय घेतला़ त्या वेळी तळोद्याचे बारगळ जहागीरदार यांनी वडाळकर कुटुंबाला हे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर बांधून दिले होत़े या परिवारातील जयराम बुवा, राजाराम बुवा, आत्माराम बुवा, कुष्णा बुवा या ज्येष्ठ सदस्यांनंतर या मंदिराची देखभाल करण्याचे काम वडाळकर परिवाराला सोपविण्यात आले आह़े या मंदिरात 153 वर्षापूर्वीची विठ्ठल-रुक्मिणीची अत्यंत आकर्षक व देखणी मूर्ती स्थापन करण्यात आली आह़े या मूर्तीवर आषाढी एकादशीच्या दिवशी दुग्धाभिषेक करण्यात येऊन सजावट करण्यात येत असत़े मंदिरात गणपती, श्रीकृष्ण, बालाजी यांच्या हाताने घडविलेल्या मूर्ती आहेत़ मंदिराच्या दर्शनी भागावर लाकडाचे कोरीव काम असलेली संत तुकाराम महाराज यांची गरुडावर स्वार असलेली वैकुंठाला जाणारी अतिशय सुंदर व आकर्षक मूर्ती आह़े ही मूर्ती पाहण्यासाठी भाविक मोठय़ा संख्येने येत असतात़ दरवर्षी आषाढी एकादशीला मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात़