नंदुरबार जिल्ह्यात पाणी योजनांची 15 कोटी थकबाकी
By admin | Published: March 31, 2017 04:37 PM2017-03-31T16:37:10+5:302017-03-31T16:37:10+5:30
वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागांतर्गत येणा:या चार तालुक्यातील पाणी योजनांच्या वीज बिलांची थकीत रक्कम 15 कोटी रूपयांवर पोहोचली आह़े
Next
374 पाणी योजनांकडे थकबाकी : शहादा विभागातील चार तालुक्यात संकट
बोरद, जि.नंदुरबार,दि.31- वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागांतर्गत येणा:या चार तालुक्यातील पाणी योजनांच्या वीज बिलांची थकीत रक्कम 15 कोटी रूपयांवर पोहोचली आह़े योजनांकडून ही रक्कम वसूल करण्यासाठी वीज कंपनी लवकरच मोहिम आखणार असून बील न भरणा:या योजनांचा वीज पुरवठा खंडीत होणार आह़े
शहादा विभागातील शहादा, तळोदा, धडगाव आणि अक्कलकुवा या चार तालुक्यात मार्चनंतर वीज कंपनी वसूली मोहिम सुरू करणार असून ग्रामपंचायतींना नोटीसा देण्याचे काम सुरू केले आह़े पाणी योजनांनी बिलांची रक्कम तात्काळ भरावी, यासाठी कंपनीकडून चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े चार तालुक्यात तब्बल 374 ग्रामपंचायतींनी ही 15 कोटी रक्कम थकवली आह़े
31 मार्चर्पयत संबधित ग्रामपंचायतींनी हा भरणा न केल्यास वीज कनेक्शन कट करण्याची मोहिम सुरू करण्यात येणार आह़े याबाबत वीज कंपनीच्या शहादा विभागाचे अधीक्षक अभियंता धनंजय भामरे यांनी ‘लोकमत’ला माहिती देताना सांगितले की, ग्रामपंचायतींकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आह़े ग्रामपंचायतींसोबत चर्चेची तयारी आह़े ग्रामपंचायतींनी थकीत रक्कम भरल्यास त्यांचाच बोजा हलका होणार आह़े शहादा विभागातील चारही तालुक्यातील ग्रामपंचायतींना मार्चअखेरीर्पयत बिल भरण्याबाबत लेखी कळवण्यात आले होत़े अद्याप त्यांचा म्हणावा तसा, प्रतिसाद मिळालेला नाही़