शहादा तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांमुळे रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 12:45 PM2020-09-29T12:45:51+5:302020-09-29T12:45:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यात सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सलग आठ दिवस जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : शहादा तालुक्यात सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सलग आठ दिवस जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतात पाणी साठून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे़ पावसामुळे उडीद, मूग या पिकांचे आधीच नुकसान झाले होते़ आताच्या सलग पावसात कापूस, सोयाबीन, पपई आदींचे नुकसान झाले आहे़ यामुळे शेतकरी हतबल झाले असून शेतातील पाण्यामुळे पिकांवर इतर रोगांचा प्रादुर्भावही वाढीस लागला आहे़
गेल्या दोन वर्षात अतीवृष्टी आणि अवकाळी यांचा फटका बसल्याने शेतकºयांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे़ खरीप हंगाम सुरु झाल्यानंतर पावसाचे आगमन झाले़ यानंतर शेतकºयांनी सोयाबीन पेरणी केली़ परंतु बियाण्याची गुणवत्ता ही खालावलेली असल्याने अनेक ठिकाणी सोयाबीन उगवलेच नाही़ यातून शेतकºयांनी दुबार पेरणी केली़ अनेकांनी दुबार पेरणी करुनही सोयाबीन उगवले नाही़ काही शेतकºयांचे सोयाबीन उगवले परंतु सलग सुरू असलेल्या पावसात हा सोयाबीन पाण्याखाली गेला असून त्यातून एक रूपयाही उत्पादन येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे़
तालुक्यात यंदाही शेतकºयांनी पपईची लागवड केली आहे़ जिल्ह्यातील सर्वाधिक पपई उत्पादन घेणारा तालुका म्हणून शहादा तालुक्याची ख्याती आहे़ अत्यंत खर्चिक अशा या पिकावर हजारो रुपयांचा खर्च करुन शेतकºयांनी झाडे जगवली होती़ पाणी शेतात पाणी साचले असल्याने पिकावर मरत आला असून झाडाची पाने पिवळी पडू लागली असल्याचे दिसून आले आहे़यंदा पपईवर प्रारंभीपासून करपा मोजेक या रोगाचा प्रादुर्भाव होता़ यातून झाडांवर कमीत कमी फळे दिसून येत होती़ पावसामुळे पपई पूर्णपणे कामातून गेली आहे़
कापूस हे नगदी पिक म्हणून ओळखले जाते़ तालुक्यात यंदा ५० हजार ४८२ हेक्टरवर कापसाची लागड करण्यात आली आहे़ तालुक्यात सरासरी ११८ टक्के हा कापूस लागवड झाला होता़ यामुळे शेतकºयांची मोठी भिस्त कापूस उत्पादनावर होती़ परंतू पावसामुळे तालुक्यातील मोठा हिस्सा बाधित झाला आहे़ तालुक्यात येत्या दोन दिवसात पंचनामे पूर्ण होवून निश्चित आकडेवारी समोर येणार आहे़ दरम्यान सलग आठ दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शेतशिवारात अद्यापही पाणी साचले आहे़ परिणामी बुरशी लागून कापसाची झाडे मरू लागली आहेत़ बोंडे अती पावसामुळे सडून गेली असून ही वाताहत पाहून शेतकरी हताश झाले आहेत़ पाणी काढणे शक्य होणार नसल्याने शेतकºयांनी पिक तसेच सोडून देण्याचा निर्णय छातीवर दगड ठेवून घेतला असल्याचेही यावेळी सांगण्यात आले़
दरम्यान कृषी विभागासोबत संपर्क केला असता काहीच ठिकाणी पंचनामे झाल्याचा खुलासा कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी वि़भा़जोशी यांच्याकडून करण्यात आला आहे़ बºयाच ठिकाणी पथक गेलेले नाही़
शहादा तालुक्यातील सारंगखेडा, कळंबू, टेंभा, कुरावद, कौठळ ,बिलाडी या गावांची भौगोलिक परिस्थिती पाहता या गावांच्या उत्तरेस डोंगराळ भाग आहे़ यामुळे उंचीवरून कोसळणारे पावसाचे पाणी सरळ दक्षिणेकडे येऊन पाणी साचते़ तालुक्यातील वडाळी, बामखेडा, कोंढावळ, जयनगर, धांद्रे यासह विविध गावात खोलगट भाग असल्याने पावसाचे पाणी शेतात साचते़ हीच गत तालुक्याच्या उत्तरेला असलेल्या गावांमध्ये आहे़ परंतु याठिकाणी सातपुड्याच्या डोंगराळ भागातून उतारावरून येणाऱ्या नद्या व नाले शेतांमध्ये पाणी आणून पिकांचे नुकसान करत आहेत़
४एकीकडे खरीप पिकांचे नुकसान झाले असताना शहादा तालुक्यातील रायखेड, ब्राह्मणपुरी परिसरातील गावात वादळी वारे आणि पाऊस यामुळे केळीच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे़ या पिकांचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी होत आहे़ झाडावर आलेल्या केळीच्या घोड्यांसह झाडे कोसळली असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे़ या पिकांचे अद्याप पंचनामे झालेले नसल्याची माहिती आहे़