सातपुडय़ात‘विषारी’ अळींचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:16 PM2019-10-27T12:16:06+5:302019-10-27T12:16:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुडय़ाच्या जंगलात आढळणा:या विषारी अळी काही वर्षापूर्वी दुर्मिळ ठरत होत्या, परंतु यावर्षी पुन्हा आढळून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुडय़ाच्या जंगलात आढळणा:या विषारी अळी काही वर्षापूर्वी दुर्मिळ ठरत होत्या, परंतु यावर्षी पुन्हा आढळून येत आहे. या अळीच्या चुकून स्पर्श झाल्यास अंगावर सुज येत असून मोठी खाजही सुटते. दुर्गम भागातील आदिवासी भाषेत या अळीला ‘विशो’ असेच म्हटले जात असून यापासून प्रत्येक व्यक्ती लांब राहत आहे.
पूर्वी दर पावसाळ्यात आढळून येणारी ही विषारी अळी मध्यंतरी काही पावसाळ्यात आढळून आल्या नाही. परंतु यंदा पुन्हा सातपुडय़ाच्या जंगलात ही अळी दिसू लागली आहे. त्यामुळे मानवासह काही पाळीव प्राण्यांना देखील या अळींचा धोका जाणवू लागला आहे. ही अळी प्रामुख्याने पळसाच्या झाडांवर आढळून येत आहे. तिचा रंगच हिरवा असल्यामुळे ती सहज लक्षात येत नाही. त्यामुळे काही कामानिमित्त या अळींचा प्रादुर्भाव असणा:या झाडांजवळून गेले व चुकून या अळीला स्पर्श झाल्यास अंगावर पळत सुटायला लावणारी खाज सुटते, शिवाय अंगाव सुजही येते. खाज लवकर बरी होत असली तरी सुज मात्र काही दिवस राहते.
पळसाच्या झाडांवर आढळणारी ही अळी सद्यस्थितीत अन्य झाडांवर देखील आढळून येत आहे. त्यामुळे जंगलात जाणा:या नागरिकांना याचा धोका अधिक जाणवत आहे. या अळींच्या प्रादुर्भावामुळे जंगलातील पळसाची झाडे करपली गेल्याचे दिसून येत आहे.