रेनवॉटर हाव्रेस्टींगद्वारे पाणीटंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:24 PM2019-06-02T12:24:40+5:302019-06-02T12:24:46+5:30

वसंत मराठे ।  लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : सध्याच्या प्रचंड तापमानामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी सातत्याने खोल जात असून शहरातील ...

Overcoming water shortage by rainwater harvesting | रेनवॉटर हाव्रेस्टींगद्वारे पाणीटंचाईवर मात

रेनवॉटर हाव्रेस्टींगद्वारे पाणीटंचाईवर मात

Next

वसंत मराठे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : सध्याच्या प्रचंड तापमानामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी सातत्याने खोल जात असून शहरातील बहुसंख्य खाजगी बोअर आटत आहेत. तथापि, येथील एका घरमालकाने पावसाचे वाया जाणारे पाणी रेनवॉटर हाव्रेस्टींगद्वारे आपल्याच घरापुढील कूपनलिकेस जिरवत आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे घराच्या आजूबाजूच्या परिसरातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे दुष्काळी स्थितीचा किंचीतही प्रभाव या भागात झालेला नाही. भूगर्भातील पाण्याची पातळी कायम राखण्यासाठी इतरांनीही असा उपक्रम राबविण्याची आवश्यकता आहे.
तळोदा शहरातील लवकुमार पिंपरे यांनी आपल्या घरापुढे बोअर केला आहे. गेल्या पाच वर्षापासून सातत्याने घटत जाणा:या पजर्न्यमानामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य निश्चितच निर्माण होणार असल्याची परिस्थिती जाणून पावसाचे  वाया जाणारे पाणी जमिनीतच जिरविण्याचा धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतला. गेल्यावर्षी             पिंपरे यांनी रेनवॉटर हाव्रेस्टींगचा उपक्रम हाती घेतला. आपल्या घराच्या छतावरील वाया            जाणारे पावसाचे पाणी पाईपद्वारे बोअरमध्ये सोडले आहे. त्याठिकाणी ठिबकचा फिल्टरदेखील बसवला आहे. त्यामुळे आपोआपच रेती, माती, गाळ व क्षार फिल्टर होऊन त्यांना शुद्ध पाणी           मिळत आहे. विशेष म्हणजे हे पाणी अतिशय गोड लागत असल्याचे ते सांगतात. त्यांच्या या रेनवॉटर हाव्रेस्टींग उपक्रमामुळे परिसरातील पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. आजूबाजूच्या बोअरचे पाणी कमी झालेले नाही. वास्तविक यंदा अल्प पजर्न्यमानामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती आहे. शिवाय रोजच्या वाढत्या तापमानामुळे भूजल पातळीही कमालीची घटत आहे. परिणामी शहरातील बहुसंख्य खाजगी बोअरचे पाणी आटत चालले आहे. मात्र या परिसरात पाण्याच्या पातळीत किंचीतही फरक पडला नसल्याचे ते म्हणतात.
20 हजाराचा खर्च
रेनवॉटर हाव्रेस्टींगसाठी लवकुमार पिंपरे यांना 20 हजार रुपये खर्च आला आहे. घराच्या तीन हजार स्क्वेअर फूट स्लॅबवरील वाया जाणारे पावसाचे पाणी आपल्याच बोअरमध्ये जिरविण्यासाठी 25 ते 30 फूट लांबीचे दोन पाईप जोडले आहेत. त्याचबरोबर कूपनलिकेजवळ ठिबक सिंचनचे दोन फिल्टर संच बसविले  आहेत. त्यामुळे त्यांना क्षारविरहीत निसर्गाचे  गोड पाणी मिळत आहे. सध्या निसर्गाचे कालचक्र बदलत चालले आहे. तळोदेकरांनी  कधी नव्हे एवढी दुष्काळी स्थिती पहिल्यांदाच पाहिली आहे. साहजिकच अशा दुष्काळी स्थितीमुळे रेनवॉटर हाव्रेस्टींग उपक्रम आवश्यक बनणार आहे.

Web Title: Overcoming water shortage by rainwater harvesting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.