पाडळदा ग्रामपंचायत बिनविरोध लोकमत न्यूज नेटवर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:51 PM2017-09-23T12:51:28+5:302017-09-23T12:51:28+5:30
शहादा : तालुक्यातील पाडळदा बुद्रुक ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच आणि सदस्य बिनविरोध निवडीसाठी प्रत्येक पदासाठी केवळ एक अर्ज दाखल करण्यात आला़ लोकनियुक्त सरपंच पदासाठीच्या प्रकियेंतर्गत जिल्ह्यातील पहिल्या बिनविरोध सरपंचाचा मान आता पाडळदा गावाला मिळणार आह़े
दोन दिवसांपूर्वीच ‘लोकमत’ने वर्तवलेल्या भाकितानुसार पाडळदा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी शुक्रवारी दुपार्पयत मुलकनबाई मोहन वळवी यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला़ तर 11 सदस्यांपैकी 10 उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आल़े यामुळे पाडळदा ग्रामपंचायत छाननी आणि माघारीपूर्वीच बिनविरोध झाली आह़े अर्ज माघारीची प्रक्रिया पार पडल्यानंतर तशी घोषणा करण्यात येणार आह़े
शुक्रवारी दुपारी प्रभाग एकमधून दिलीप आलम पाडवी, संगिताबाई माणिक सूर्यवंशी, प्रभाग दोन मधून वासुदेव बन्सी माळी, मनिषा शरद चौधरी, प्रभाग तीन मधून रविंद्र सखाराम पाटील, द्वारकाबाई केस:या गांगुर्डे, रोशनी भरत कोळी, प्रभाग चार मधून चैत्राम रूपचंद वळवी, मनोज विजय पाटील, संगिता कैलास वळवी या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होत़े त्यांचे अर्ज हे त्या जागेसाठी एकमेव असल्याने त्यांची निवड बिनविरोध मानली जात आह़े 11 पैकी 10 अर्ज आल्याने एक पद रिक्त राहणार आह़े शहादा तालुक्यात पहिली बिनविरोध ग्रामपंचायतीचा मान पाडळदा ग्रामपंचायतीने मिळवल्यानंतर गावात आनंद व्यक्त करण्यात येत होता़ गावात यापूर्वी झालेली बैठक, उमेदवारांची चाचपणी व ज्येष्ठांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय झाला़