नवापुर तालुक्यातील नुकसानग्रस्तांच्या वेदना मुख्यमंत्र्यांर्पयत पोहोचविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 11:28 AM2018-08-21T11:28:57+5:302018-08-21T11:29:04+5:30
मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार : खासदार राजेंद्र गावीत यांची नवापूर व विसरवाडीला भेट
विसरवाडी : नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथील पुरग्रस्त भागात पालघरचे खासदार राजेंद्र गावीत यांनी भेट दिली. उद्या होणा:या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नुकसानीबाबत चर्चा करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देऊ असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.
विसरवाडी येथील सरपणी नदीच्या महापुरातील नैसर्गिक आपत्तीमुळे नदी किनारी राहणा:या रहिवाशांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. यात तालुक्यातील पाच जणांचा बळी गेला व अनेकांची जनावरे दगावली. तसेच अनेकांची घरे वाहून गेली, शेतीचे मोठे नुकसान झाले. या पुरग्रस्त भागाला पालघरचे खासदार राजेंद्र गावीत यांनी भेट दिली असता त्यांच्या झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. झालेल्या नुकसानाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जास्तीत जास्त प्रमाणात नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
लोकमतशी बोलतांना खासदार गावीत यांनी सांगितले की, नवापूर तालुक्यातील जनतेने मागील 50 ते 60 वर्षात हा मोठा प्रलय अनुभवला आहे. यात ग्रामस्थांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेकांची घरे वाहून गेलेली तर पाळीव जनावरे दगावली आहेत. अनेकांचे संसार उघडय़ावर पडले आहेत. अश्यावेळी शासनाकडून मिळणारी मदत फार कमी प्रमाणात मिळते ही मदत फार अपुरी पडते याबाबत मी जिल्हाधिका:यांशी चर्चा केली आहे.
या दु:खद घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सर्व अहवाल सादर करून पुरग्रस्तांना जास्तीत जास्त निधी कसा प्राप्त करून देता येईल याबाबत मागणी करणार आहे. तसेच आदिवासी विभागाच्या मंत्र्यांशीदेखील आदिवासी खात्याकडून कसा निधी उपलब्ध करता येईल याबाबत चर्चा करणार आहे.
हा माझा मतदारसंघ नसला तरी या भागाशी माझी बांधीलकी आहे. मी याच मातीतला आहे आणि हे माङो कर्तव्यदेखील आहे, असे मी समजतो. यावेळी त्यांच्यासोबत नवापूर नायब तहसीलदार बी.एस.पवार, मंडळ अधिकारी बी.एन.सोनवणे, हळदाणीचे तलाठी आर.एल. पाडवी उपस्थित होते. नवापूर तालुक्यात महापुरामुळे आलेल्या नैसर्गिक आपदेचे चित्र चिंताजनक असून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नवापूरसाठी वाढीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रय} करु अशी ग्वाही पालघरचे खासदार राजेंद्र गावीत यांनी दिली. पूरग्रस्त विसरवाडी व नवापूरची पाहणी करून त्यांनी तहसील कार्यालयात आढावा घेतला. उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार राजेंद्र नजन व दराडे यांनी खासदार राजेंद्र गावीत यांना पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. या बैठकीनंतर लोकमतशी बोलताना त्यांनी सांगितले की, नवापूर तालुक्यात नैसर्गिक आपदेचे चित्र चिंताजनक आहे. लोकांसह शेतक:यांना मोठा फटका बसला आहे. त्याची पुनर्बाधणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नवापूरसाठी वाढीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रय} करु अशी ग्वाही देत ते म्हणाले मी कुठेही असलो तरी माझी बांधीलकी नंदुरबार जिल्ह्याशी राहिली आहे. त्याच भावनेतून नवापुरात येवून पूरग्रस्त लोकांच्या भेटी घेतल्याचे त्यांनी सांगितले.