साक्षरता पंधरवड्यानिमित्त चित्रकला प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:36 AM2021-09-17T04:36:25+5:302021-09-17T04:36:25+5:30
१ ते १५ सप्टेंबरपर्यंत झालेल्या साक्षरता पंधरवड्यानिमित्त शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांच्या ...
१ ते १५ सप्टेंबरपर्यंत झालेल्या साक्षरता पंधरवड्यानिमित्त शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांच्या सूचनेनुसार प्राचार्य एस.पी. पाटील, उपमुख्याध्यापक डी.टी. चौधरी, पर्यवेक्षक चंद्रकांत पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली कला शिक्षक नरेंद्र गुरव यांनी पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी साक्षरता या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन व आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची ऑफलाइन चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्यात ६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी उत्कृष्ट ३८ चित्रांचे शाळेमध्ये प्रदर्शन भरवण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य एस.पी. पाटील यांनी केले. या प्रदर्शनात प्रथम दर्शना छोटूसा सामुद्रे, द्वितीय यश अशोक चौधरी, तृतीय धनश्री सुधाकर मराठे तर उत्तेजनार्थ वृषाली वाडिले, रितेश शिंपी, जागृती पाटील यांनी यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रदर्शनासाठी दीपक निकुंभ, दीपक कोकणी, वैकुंठ पाटील, राजेंद्र पाटील, संजय मकवाना, विष्णू जोंधळे, सुरेश जाधव, आत्माराम भोई आदींनी सहकार्य केले. ‘शिकलेली आई घराला पुढे नेई’, ‘आई शिकली तर पूर्ण कुटुंबाचा उद्धार होतो’ या विषयावर आधारित विद्यार्थ्यांनी सुंदर चित्रे रेखाटली होती.