साहित्यावरील चर्चेसह सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणली रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 01:21 PM2019-01-09T13:21:16+5:302019-01-09T13:21:20+5:30
जिल्हा ग्रंथोत्सव : युवकांसाठी स्पर्धा परीक्षेवरील चर्चेसह बालकवी कट्टाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नंदुरबार: जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथोत्सव समन्वय समिती यांच्यावतीने आयोजित जिल्हा ग्रंथोत्सवाच्या दुस:या दिवशी साहित्य चर्चेसह बालकवी संमेलन आणि युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला़ रविवारी सायंकाळी याठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली होती़
स्पर्धा परीक्षा व आजचा विद्यार्थी
शहरातील नेहरु चौकातील नियोजित तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर ग्रंथोत्सवाच्या दुस:या दिवशीच्या पहिल्या सत्रात स्पर्धा परीक्षा आणि आजचा विद्यार्थी या विषयावर मार्गदर्शन व्याख्यान झाल़े यात धुळे येथील युनिक अॅकडमीचे मार्गदर्शन राहुल पाटील यांनी विद्याथ्र्यासोबत संवाद साधला़ यात त्यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षा खरोखर जीवन बदलण्याची प्रक्रिया असून तरुणांनी या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शालेय काळापासून तयारी करण्याची गरज आह़े वर्तमान, भूत आणि भविष्यकाळावर अधिराज्य गाजवण्याची क्षमता तरुणांमध्ये असत़े म्हणून तरुणांनी स्वपAानांना ध्येय मानून स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणे आवश्यक आह़े विद्याथ्र्यानी सातत्याने निदान 6 ते 10 तास अभ्यास करणे महत्त्वाचे आह़े यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मिनाक्षी गिरी, समाजकल्याण अधिकारी राकेश महाजन, सहायक प्रकल्पाधिकारी प्रदीप देसाई, प्रविण पाटील आदी मान्यवर उपस्थित होत़े सूत्रसंचालन धनराज पाटील यांनी तर आभार मनोज शेवाळे यांनी मानल़े
बालकवी संमेलन रंगले
ग्रंथोत्सवात विद्याथ्र्यासाठी यंदाही बालकवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होत़े यात विविध शाळेतील 136 विद्याथ्र्यानी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला़ बालकवींच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे याठिकाणी त्यांच्या तोंडून कविता ऐकण्यासाठी पालकांसह शहरातील नागरिकांनीही उपस्थिती दिल्याने सभामंडप हाऊसफुल्ल झाला होता़ संमेलनाच्या अध्यक्षा डॉ़ सविता पटेल होत्या़ त्यांनी काव्य हे जीवन फुलवण्याचे कार्य करते हे सांगतानाच उदयोन्मुख बाल कवींना सूचना दिल्या़ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रभाकर भावसार, विजय पाटील, सिमा मोडक, रमेश महाले उपस्थित होत़े कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश शिंदे यांनी तर आभार वर्षा टेंभे यांनी मानल़े दहा बालकवींना विविध ग्रंथ भेट म्हणून देण्यात आल़े
गीतगायनाची रंगत
रविवारी सायंकाळी ग्रंथोत्सवात संगीत रजनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आह़े यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांनी गितांचे सादरीकरण करत उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केल़े कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधिक्षक संजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्रकुमार गावीत, अभिजीत पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ़ पितांबर सरोदे उपस्थित होत़े सूत्रसंचालन श्रीराम दाऊतखाने यांनी तर आभार भिमसिंग वळवी यांनी मानल़े
पुस्तकांची खरेदी
रविवारी उद्घाटन झालेल्या या उत्सवात प्रमुख आकर्षण असलेल्या पुस्तकांच्या स्टॉल्सवर मोठय़ा संख्येने नागरिक भेट देत होत़े सोमवारी दिवसभरही गर्दी कायम होती़ विविध लेखकांची अनुवादित व आत्मचरित्रपर पुस्तकांना पसंती दिली गेली़