नंदुरबारात नागरिकांच्या सतर्कतेने पकडला गेला पाकिटमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:28 PM2018-09-14T12:28:23+5:302018-09-14T12:28:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बसमध्ये चढणा:या प्रवाशाच्या खिशातून पैशाचे पाकिट चोरून पळणा:या दोघांपैकी एका चोरटय़ास नागरिकांच्या सर्तकतेमुळे पकडण्यात पोलीसांना यश आल़े बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नंदुरबार बसस्थानकात हां प्रकार घडला़
नंदुरबार जिल्हा परिषदेत विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत शंकर जनार्दन निकाळजे हे मंगळवारी धुळे येथे जाण्यासाठी बसस्थानकात आले होत़े बसमध्ये चढत असताना त्यांच्या खिशातील पैशाचे पाकिट चोरीला गेल़े 12 हजार रुपये रोख आणि महत्त्वाचे कागदपत्रे असलेले हे पाकिट चोरी करणारे पळून जात असल्याचे नागरिकांनी निकाळजे यांच्या निदर्शनास आणून दिल़े दोघे चोरटे पळून जात असताना नागरिकांनी आरडोओरड करण्यास सुरूवात केली़ यावेळी बसस्थानकात कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक भरत पावरा यांच्या ही बाब ध्यानात आल्याने त्यांनी चोरटय़ांचा पाठलाग सुर केला़ यादरम्यान दोघांपैकी एक चोरटा हा मुख्य प्रवेशद्वारातून पळून जाण्यात यशस्वी झाला तर चोरटा पोलीस नाईक पावरा यांच्या हाती लागला़ रविंद्र भिला साळवे रा़ उमर्दे खुर्द असे चोरटय़ाचे नाव असून त्याला तात्काळ शहर पोलीस ठाण्यात आणल्यावर त्याच्याकडून 5 हजार 400 रूपये पोलीसांनी जप्त केल़े पहून गेलेल्या साथीदाराचे नाव उमेश सोडा (पूर्ण नाव माहित नाही) रा़ संजय नगर असल्याची माहिती त्याने पोलीसांना दिली आह़े याबाबत शंकर निकाळजे यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रविंद्र कुवर करत आहेत़ दरम्यान पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या रविंद्र साळवे यास गुरुवारी नंदुरबार न्यायालयात हजर करण्यात आले होत़े त्यास 1 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आह़े दुस:या चोरटय़ाचा पोलीस शोध घेत आहेत़ नागरिकांच्या सतर्कतेमुळेच चोरटा पकडला गेल्याचे पोलीसांनी सांगितल़े