नंदुरबारात गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त पालखी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:43 PM2018-02-08T12:43:00+5:302018-02-08T12:43:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त नंदुरबारात पालखी मिरवणुकीसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी मोठय़ा संख्येने त्यात सहभाग घेतला.
शहरातील पाताळगंगा नदी काठावर श्री गजानन महाराज यांचे मंदीर आहे. सकाळी या ठिकाणी महाआरती व पूजा करण्यात आली. त्यानंतर पालखीला सुरुवात झाली. भजन, किर्तन म्हणत आणि टाळच्या गजरात पालखी मिरवणूक साक्रीनाका, सराफा बाजार, सोनारखुंट, गणपतीमंदीर, तूप बाजार, सिद्धीविनायक मंदीर, यार्दीचे राममंदीर, शिवाजीरोडने साक्रीनाका मार्गे मंदीरावर पालखीचा समारोप करण्यात आला. पालखी मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
सायंकाळी महाआरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभर मंदीरावर विविध उपक्रम सुरू होते. कार्यक्रमांच्या आयोजनासाठी भाविकांनी स्वत:च नियोजन व श्रमदान केले.