प्रकाशा येथे पडझड झालेल्या 45 घरांचे पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:41 PM2019-08-11T12:41:37+5:302019-08-11T12:41:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा गावात अतिवृष्टीमुळे सुमारे 45 मातीचा घरांची व भिंतींची पडझड झाली असून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा गावात अतिवृष्टीमुळे सुमारे 45 मातीचा घरांची व भिंतींची पडझड झाली असून त्यांचे पंचनामे सुरू आहेत. प्रकाशा परिसरात गावातील झोपडय़ा, मातीची घरे, भिंती आदींची पडझड झाल्याने नुकसान झाले आहे. मंडळ अधिकारी मुकेश चव्हाण, तलाठी डी.एम. चौधरी, प्रमोद सामुद्रे, शशिकांत सामुद्रे आदींनी गावात तीन दिवसापासून पंचनाम्यांचे काम सुरू केले असून आतार्पयत 45 ठिकाणचे पंचनामे झाले आहेत. यात सर्वात जास्त नुकसान पिंपरहाटीतील कलाबाई उखा भिल यांचे झाले आहे. त्यांचे पूर्ण घर बसल्याने संसार उद्ध्वस्त झाल्याची माहिती तलाठी डी.एम. चौधरी यांनी दिली आहे.