तळोदा तालुक्यात पंचनामे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 12:47 PM2020-09-29T12:47:20+5:302020-09-29T12:47:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यात संततधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत़ पथकांनी आजअखेरीस ५९ हेक्टरचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा तालुक्यात संततधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत़ पथकांनी आजअखेरीस ५९ हेक्टरचे पंचनामे पूर्ण केले असून येत्या चार दिवसात संपूर्ण आकडेवारी समोर येण्याची शक्यता आहे़
तालुक्यात मुसळधार पावसामुळे पपई, केळी, उडीद, कापूस, ज्वारी, मूग या पिकांचे नुकसान झाले आहे़ या पिकांचे पंचनामे सुरू असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत असला तरी भरपाई तात्काळ मिळाल्यावरच शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे़ दरम्यान आॅगस्ट महिन्यात तालुक्यात २४७ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते़ या पिकांच्या भरपाईसाठी ४७ लाख रूपयांची मदत प्रस्तावित आहे़ तालुक्यात झालेल्या पावसामुळे पपई आणि केळीचे अतोनात नुकसान झाले आहे़
४तळोदा तालुक्यातील मोड व बोरद पट्ट्यात बागायतदार शेतकºयांची संख्या मोठी आहे़ या बागायतदारांच्या ऊस, कापूस, केळी आणि पपई या पिकांची वाताहत झाली आहे़
४पाण्यात उभ्या असलेल्या पपई झाडांवर निरनिराळे रोग आल्याचे सांगण्यात आले आहे़
४बºयाच ठिकाणी कापूस जमिनीवर पडून असल्याने त्याचा कोणताही उपयोग होणार नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत़