पंचनाम्यांनी बळीराजा बेहाल : नंदुरबारात उभ्या पिकांचेच केवळ पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:38 PM2018-01-15T12:38:10+5:302018-01-15T12:38:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बोंडअळीनंतर आता शेतक:यांसमोर दुसरे संकट उभे ठाकले आह़े शेतात उभ्या असलेल्या कपाशी पिकांचेच केवळ पंचनामे करण्यात येत असल्याने इतर शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े सर्वच कपाशीच्या क्षेत्रांचे पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी शेतक:यांकडून करण्यात येत आह़े
यंदा कपाशी उत्पादक शेतक:यांच्या मेहनतीवर बोंडअळीने पाणी फेरले होत़े पांढरे सोनं उगवणा:या शेतक:यांना यामुळे मोठा आर्थिक तोटाही सहन करावा लागत आह़े नंदुरबार जिल्ह्यात साधारणत 1 लाख 2 हजार हेक्टर कपाशीच्या क्षेत्रापैकी 50 टक्के क्षेत्र बोंडअळीग्रस्त आह़े बोंडअळीच्या थैमानामुळे येथील शेतक:यांसमोर अनेक संकटे निर्माण झाली आह़े कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचे काम अंतीम टप्प्यात सुरु आह़े परंतु पंचनामे करताना ज्या शेतक:यांच्या शेतात कापूस पिक आह़े त्याच शेतक:यांच्या क्षेत्राचे पंचनामे करण्यात येत आह़े परंतु खरे तर, बहुतेक कपाशी उत्पादक शेतक:यांनी बोंडअळीच्या प्रादुर्भावानंतर आपल्या कपाशीच्या क्षेत्रावर नांगर फिरवला होता़ व आपली जमीन दुसरे पिक घेण्यासाठी रिकामी केली होती़ परंतु अशा शेतक:यांच्या शेतात सध्या कपाशीचे पिक नसल्यामुळे ते पंचनाम्यापासून वंचित राहत असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे अशा शेतक:यांच्या नुकसानीचे काय? असा प्रश्न यातून निर्माण होत आह़े त्यामुळे ज्या शेतक:यांनी आपल्या शेतात नांगर फिरवले आहे, अशांच्या क्षेत्राचेही पंचनामे आवश्यक असल्याचे मत शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े
शेतकरी सापडताय दुहेरी संकटात
यंदा कपाशीवर बोंडअळीने थैमान घातले होत़े त्यामुळे याचा परिणाम म्हणून शेतक:यांकडून कपाशीवर लावण्यात आलेल्या सर्व पैसा वाया गेला तर दुसरीकडे कृषी विभागाकडूनही पंचनामे करताना भेदभाव करण्यात येत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला असल्याचे सांगण्यात येत आह़े कपाशीवर मोठा खर्च झाला आह़े त्यातच, बोंडअळीने पिकाला कुरतळल्याने शेतक:यांची सर्व मेहनत व पैसा वाया गेला आह़े नंदुरबार तसेच शहादा तालुक्यात मोठय़ा संख्येने कपाशीचे उत्पादन घेण्यात येत असत़े परंतु या ठिकाणी बहुतांश शेतक:यांनी बोंडअळीमुळे कापसाच्या पिकावर नांगर फिरवत दुस:या पिकासाठी शेत रिकामे केले आहेत़ परंतु या ठिकाणच्या बहुतेक शेतक:यांच्या कपाशीच्या क्षेत्राचे पंचनामे झाले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े
अनेक ठिकाणी शेतक:यांनी कजर्बाजारी होऊन कपाशीचे पिक घेतले आह़े परंतु त्यावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतक:यांना डोळ्यासमोर कपाशीच्या क्षेत्रावर नांगर फिरवावा लागला होता़ त्यातच आता कृषी विभागाकडूनही अशा प्रकारे हेळसांड होत असल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े प्रशासनाने शेतक:यांचा विचार करुन पंचनामे करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े