वाढत्या तापमानामुळे पपई संकटात
By admin | Published: March 29, 2017 11:43 PM2017-03-29T23:43:31+5:302017-03-29T23:43:31+5:30
भावही घसरला : उत्पादक शेतकºयांकडून विविध उपाययोजना
ब्राह्मणपुरी : दिवसेंदिवस पडत असलेल्या कडाक्याच्या उन्हामुळे पपई पीक संकटात सापडले आहे. आधीच घसरलेल्या दरामुळे यापुढे पपईची लागवड करावी की नाही, अशा प्रश्न पपई उत्पादक शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.
शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी परिसरात पपईची लागवड करण्यात येते. दहा महिन्यांच्या या पिकाला दर चार ते पाच दिवसात पाणी देण्याची आवश्यकता असते. ब्राह्मणपुरी परिसरातील पपई पंजाब, दिल्ली, हरियानासह विविध राज्यात रवाना होते. मात्र यंदा पपई पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यात पपईवर व्हायरल येत असल्याने ती खराब होत आहे. याशिवाय सध्या गेल्या आठवड्यापासून तापमानाने चाळिशी गाठली आहे. बदलत्या वातावरणामुळे पिके धोक्यात आलेली आहे. उन्हामुळे झाडावरील छत्र्या गळत असल्याने पपई फळ निकामी होत आहे. काही शेतकºयांनी गोणपाट, पांढरे कापड लावून पपईला जगविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यातूनही पपईचे पूर्णपणे संरक्षण होत नसल्याचे समोर येत आहे.
आजच्या स्थितीत पपई पिकाला पाच ते साडेपाच रुपये प्रती किलोने भाव मिळत आहे. त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. अशा मन:स्थितीमुळे अनेक शेतकरी थेट पपई पिकावर रोटाव्हेटर फिरवून पपईचे क्षेत्र खाली करीत असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)
बदलत्या वातावरणाने पपई पीक खराब होत आहे. पपई पिकावर पांढरा व्हायरस येत असल्याने पपई खराब होत आहे. उन्हामुळे पपईच्या झाडावरील छत्र्या गळत असल्याने पपई फळ खराब होत आहे. मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे पपई व केळी पिकाच्या नुकसानीची अद्यापपर्यंत भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे संबंधितांनी नुकसानग्रस्त शेतकºयांना लवकरात लवकर भरपाई द्यावी, अशी अपेक्षा.
-विजय पाटील,
शेतकरी