पपईला प्रतिकिलो 13 रुपये भाव द्या अन्यथा चालते व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 11:11 AM2018-12-08T11:11:32+5:302018-12-08T11:11:36+5:30

दरवाढीचे आंदोलन पेटणार : पपई उत्पादकांचा इशारा

PAPAYA REPENTS Give the price of Rs 13, otherwise run! | पपईला प्रतिकिलो 13 रुपये भाव द्या अन्यथा चालते व्हा!

पपईला प्रतिकिलो 13 रुपये भाव द्या अन्यथा चालते व्हा!

Next

नंदुरबार : जिल्ह्यातील पपई व्यापा:यांनी प्रतिकिलो 13 रुपये दराने खरेदी करावी, अन्यथा शेतशिवारात पाय ठेवू नये, निर्धारित दर न मिळाल्यास शनिवारपासून पपई तोड बंद करण्याचा इशारा पपई उत्पादकांनी दिला आह़े शहादा बाजार समितीच्या आवारात शेतकरी संघर्ष समिती आणि स्वाभीमानी शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या बैठकीत हा इशारा देण्यात आला़
या बैठकीस जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतक:यांसह धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी उपस्थित होत़े यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अभिजीत पाटील, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी, सचिन पाटील, गणेश पाटील, अॅड़ स्वर्णसिंग गिरासे, जितेंद्र पाटील, विठोबा माळी, पिंटू पाटील, गणेश पाटील, रविंद्र पाटील, पमन पाटील उपस्थित होत़े बैठकीत गेल्या वर्षी व्यापा:यांनी 8 रुपयांर्पयत प्रतिकिलो दर देण्याचे निश्चित करुनही कालांतराने या दरांमध्ये कमी केल्याचे सांगून शेतक:यांनी नाराजी व्यक्त केली़  गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पपई तोड सुरु झाली आह़े व्यापारी गेल्या वर्षाच्या दरांनुसार खरेदी करण्याचा आग्रह करत असल्याची माहिती देण्यात आल्यानंतर 13 रुपयांखाली एक रुपयाही कमी न घेता व्यापा:यांना पपई विक्री करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला़ 
स्वाभीमानी संघटनेचे घनश्याम पाटील यांनी सांगितले की, शेतकरी राबराब राबून पपईचे संगोपन करतात परंतू व्यापारी त्यांच्या कष्टाची किंमत सात आणि आठ रुपयाने ठरवतात़ चांगल्या दर्जाचे फळ निर्माण होऊनही ही अवहेलना खपवून घेतली जाणार नाही़ 
प्रसंगी चोपडा, पारोळा, मुक्ताईनगर, नरडाणा, शिंदखेडा, धरणगाव, पाचोरा येथील शेतकरीही उपस्थित होत़े जिल्ह्यात गेल्या काही वर्षात पपईच्या लागवड क्षेत्रात वाढ होऊन बागायती शेतक:यांचा आधार म्हणून त्याकडे पाहिले जात़े सर्वसाधारण 2 हजार 100 हेक्टर क्षेत्रात पपई लागवड करण्यात येत़े यंदा शहादा तालुक्यात 2 हजार 354, तळोदा 394, नंदुरबार 983 तर अक्कलकुवा तालुक्यात 50 हेक्टरवर पपई लागवड करण्यात आली आह़े एकूण 3 हजार 781 हेक्टरवर पपईच्या बागा असून  राज्यात सर्वाधिक पपई लागवड ही नंदुरबार जिल्ह्यात आह़े या पपई उत्पादनाला दरवर्षी वाढीव दर देण्याबाबत शेतकरी आणि व्यापारी असा संघर्ष होतो़ गेल्या पाच वर्षात व्यापा:यांनी पपईच्या प्रतिकिलो दरांमध्ये केवळ पाच रुपयांची  वाढ केली होती़ यामुळे यंदा शेतक:यांनी 13 रुपये प्रतिकिलो दराने खरेदीच्या मागणीवर ठाम भूमिका घेतली आह़े 
 

Web Title: PAPAYA REPENTS Give the price of Rs 13, otherwise run!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.