लसीकरणाबाबत पालकांच्या शंकांमुळे शिक्षक झाले बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:45 PM2018-12-01T12:45:39+5:302018-12-01T12:45:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील शाळांमध्ये गेल्या मंगळवारपासून सुरू झालेल्या गोवर-रुबेला लसीकरणाची शिक्षकांना चांगलीच डोकेदुखी झाली आहे. पालकांच्या ...

Parents have become teachers due to vaccination | लसीकरणाबाबत पालकांच्या शंकांमुळे शिक्षक झाले बेजार

लसीकरणाबाबत पालकांच्या शंकांमुळे शिक्षक झाले बेजार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील शाळांमध्ये गेल्या मंगळवारपासून सुरू झालेल्या गोवर-रुबेला लसीकरणाची शिक्षकांना चांगलीच डोकेदुखी झाली आहे. पालकांच्या विविध शंका आणि प्रश्नांचे उत्तरे देता देता नाकीनऊ येत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आतार्पयत 41 हजारापेक्षा अधीक विद्याथ्र्याना लसीकरण करण्यात आले आहे. कुणाही विद्याथ्र्याला या लसीचा त्रास झाला नसल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात मंगळवारी गोवर-रुबेला लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. त्याआधी गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासन आणि शाळा स्तरावर त्यासाठी जनजागृती करण्यात येत होती. शाळांमध्ये पालक सभा घेवून याबाबत माहितीही देण्यात आली आहे. असे असतांनाही अनेक पालक या लसीकरणासंदर्भातत विविध प्रश्न उपस्थित करून शिक्षकांना भंडावून सोडत आहेत. 
विशेषत: पालिका शाळा आणि ग्रामिण भागात जिल्हा परिषद शाळांमध्ये अनेक किस्से घडत आहेत. पोलिओ लसीसारखी पाजण्याची लस का दिली जात नाही असा सर्वसाधारण पहिला प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. लस टोचल्यावर बालकाला काही त्रास झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची हा प्रश्नही शिक्षकांना अनुत्तरीत करणारा ठरत आहे. ज्या शाळांमध्ये जास्त संख्येने विद्यार्थी आहेत तेथे आरोग्य विभागाकडून पर्यायी व्यवस्था अर्थात रुग्णवाहिका किंवा डॉक्टरांचे पथक तैणात ठेवण्यात आले आहे का? आदी बाबी उपस्थित केल्या जात आहेत. 
नंदुरबारात काही खाजगी प्राथमिक व अंगणवाडी  केंद्रातील बालकांना थेट कार्ड देवून पालिका रुग्णालयात किंवा जिल्हा रुग्णालयात लसीसाठी पाठविलेजात आहे. यामुळे अनेक पालकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. शाळेतच लस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. याआधी बालकांना या लसी दिल्या गेल्या असतील तरी या मोहिमेअंतर्गत लस दिली तरी ते चालणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आतार्पयत 41 हजारापेक्षा अधीक विद्याथ्र्याना लसीकरण करण्यात आले आहे. आतार्पयत एकाही विद्याथ्र्याला त्रास झालेला नाही. त्यामुळे पालकांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये. आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके यांनी सांगितले.

Web Title: Parents have become teachers due to vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.