विद्यार्थी प्रवेशासाठी पालकांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 11:11 AM2017-08-24T11:11:08+5:302017-08-24T11:11:08+5:30

तळोदा प्रकल्पावर धरणे : इंग्रजी शाळेत कोटा वाढविण्याची मागणी

Parents' Stretch for Students Admission | विद्यार्थी प्रवेशासाठी पालकांचा ठिय्या

विद्यार्थी प्रवेशासाठी पालकांचा ठिय्या

Next
कमत न्यूज नेटवर्कतळोदा : नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आदिवासी विद्याथ्र्याचा प्रवेशाचा कोटा वाढवून द्यावा यासाठी पालकांनी पुन्हा मंगळवारी प्रकल्प कार्यालयावर ठिय्या मांडला होता. स्थानिक प्रकल्प प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने शेवटी जिल्हा प्रशासनाकडे दाद मागितली. वाढीव जागांसाठी आदिवासी विकास विभागाकडे पुन्हा पाठपुरावा करण्याची लेखी दिल्यानंतर आंदोलकांनी ठिय्या मागे घेतला.इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेशासाठी तळोदा, धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील पालकांनी तळोदा प्रकल्पाकडे जवळपास 26 हजार 100 अर्ज दाखल केले होते. यातील दोन टप्प्यात साधारण 600 विद्याथ्र्याना प्रवेश देण्यात आला आहे. अजूनही एक हजार 600 विद्यार्थी बाकी आहेत. दुर्गम भागातील आदिवासी विद्याथ्र्याचा इंग्रजी शाळांकडे शिकण्याचा कल असताना आदिवासी विकास विभाग दखल घ्यायला तयार नाही. या प्रकरणी पालकांनी दोन-तीन वेळा आंदोलन केले. मात्र अधिकारी वरिष्ठस्तरावर पाठपुरावा करण्याचे पोकळ आश्वासन देतात. त्यामुळे संतप्त पालकांनी मंगळवारी पुन्हा प्रकल्पावर मोर्चा नेऊन तेथे तब्बल सहा तास ठिय्या मांडला. मात्र स्थानिक प्रकल्प प्रशासनाने दखल घेण्याऐवजी आंदोलनास बेदखल केले. शेवटी आंदोलकांनी जिल्हाधिका:यांना दूरध्वनीने माहिती दिली. त्यांनी तातडीने दखल घेत प्रकल्प प्रशासनास आदेश दिले. त्यानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी अशोक तांबोळी, शैलेश पटेल यांनी आंदोलकांची भेट घेवून पुन्हा वाढीव जागांसाठी आदिवासी विकास आयुक्तालयाकडे ठोस पाठपुरावा करण्याचे लेखी दिल्यानंतर ठिय्या मागे घेण्यात आला. आंदोलकांनी भर पावसात ठिय्या मांडला होता. याबाबत प्रशासनाने ठोस कार्यवाही केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. या आंदोलनात गोटू पावरा, गौतम वळवी, सुरेश वळवी, विक्रम वळवी आदींसह 200 पालक उपस्थित होते.

Web Title: Parents' Stretch for Students Admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.