मोलगी येथे बालकांच्या पोषणाला परसबागेची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:24 PM2017-11-06T12:24:19+5:302017-11-06T12:24:19+5:30
Next
ठळक मुद्दे20 प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन
ल कमत न्यूज नेटवर्कमोलगी : कुपोषणाची समस्या मार्गी लागावी यासाठी युनिसेफच्या सहकार्याने मोलगी ता़ अक्कलकुवा येथे पोषण पुनसर्वन केंद्र सुरू केले आह़े सुदृढ आणि परिपूर्ण पोषण या दोन घटकांतून कुपोषण थांबवण्याचे प्रयत्न सुरू असून या केंद्रातच भाजीपाला उत्पादन करून तो बालकांना देत त्यांचे आरोग्य सुदृढ करण्याचा प्रयोग राबवण्यात येत आह़े मोलगी ग्रामीण रूग्णालयात मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्याहस्ते मे महिन्यात पोषण पुनवर्सन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले होत़े सात महिन्यांपासून सुरू झालेल्या या प्रकल्पाद्वारे दुर्गम भागातील बालकांवर उपचार झाले आहेत़ केंद्रात दाखल होणा:या बालकांना विविध घटक असलेला आहार देण्याची येथील पद्धत आह़े यासाठी केंद्राचे कर्मचारी आणि बालकांचे पालक या दोघांकडून भाजीपाला उत्पादन केले जात आह़े युनिसेफने जगातील कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी प्रथिने, कबरेदके, लोह आदी सात विविध घटकांचा अन्नपदार्थात समावेश असा आग्रह धरला आह़े यानुसार जिल्ह्यात सुरू झालेल्या पोषण पुनवर्सन केंद्रात बालकांचे आरोग्य सांभाळण्यात येत आह़े हे आरोग्य आणखी सुदृढ रहावे यासाठी परसबागेच्या माध्यमातून कुपोषित बालकांच्या माता-पित्यांना भाजीपाला लागवड आणि संगोपनाचे प्रशिक्षण युनिसेफ आणि आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून देण्यात येत आह़े