जिल्ह्यातील 30 ग्रामपंचायती घेणार स्वच्छता सव्रेक्षणात सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 01:01 PM2019-08-22T13:01:53+5:302019-08-22T13:01:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ सव्रेक्षण 2019 ची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ सव्रेक्षण 2019 ची घोषणा करण्यात आली आह़े या उपक्रमात जिल्ह्यातील 30 ग्रामपंचायती सहभाग घेणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे यांनी कळवली आह़े
राज्यात 15 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या दरम्यान सव्रेक्षण होणार आह़े यात उत्कृष्ठ ठरणा:या राज्यातील दोन जिल्ह्यांना 2 ऑक्टोबर रोजी सन्मानित करण्यात येणार आह़े यात नंदुरबार जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कक्षाकडून तयारी सुरु करण्यात आली असून 595 पैकी कोणत्याही 30 ग्रामपंचायतींना स्वच्छता सव्रेक्षणाची संधी देण्याचे नियोजन करण्यात आले आह़े या गावांची निवड करण्यासाठी राज्यस्तरावर नियुक्त असलेली समिती जिल्ह्यात येण्याच्या एकदिवस आधी गावांची यादी देणार आह़े त्यानुसार त्या-त्या गावात जाऊन पाहणी होणार आह़े समितीकडून सरकारी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडे बाजार, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जाऊन शौचालयांची सुविधा पाहणी, वापरातील शौचालय, त्यांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वापरातील स्वच्छता सुविधा, प्लास्टिक कच:याची स्थिती यासाठी गुण देण्यात येणार आहेत़ या दरम्यान समिती खुली बैठक, मुलाखती, सामूहिक चर्चा करुन प्रतिक्रीया जाणून घेणार आह़े
गोपनीय पद्धतीने गावांची निवड होणार असल्याने ग्रामपंचायतींचे पदाधिकारी आणि त्या-त्या गावातील ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आह़े ही समिती जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात येण्याचा अंदाज बांधला जात असून सहभागासाठी इच्छुक असलेल्या गावांमध्ये तयारी सुरु करण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ सारिका बारी यांनी दिली आह़े