मोदलपाडा येथील 340 युवकांचा दिंडल नृत्यात सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:54 AM2018-02-28T11:54:02+5:302018-02-28T11:54:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
मोदलपाडा : सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील अलिविहीर (सोजडान) येथे गेल्या 10 दिवसापासून गेर दिंडल नृत्याच्या प्रशिक्षणाला सुरूवात झाली आहे. होलिकात्सवात करण्यात येणा:या या गेर दिंडल नृत्यात युवक सहभागी होतात.
यंदाही या प्रशिक्षणात तब्बल 340 युवकांनी सहभाग नोंदविला आहे. होलिकोत्सव साजरा करणा:या सातपुडय़ाच्या पायथ्यालगतच्या गावांमध्ये गेर दिंडलनृत्य लोकप्रिय आहे. या नृत्याचे कार्यक्रम होळीच्या दुस:या दिवसापासून आयोजित करण्यात येतात. धुलिवंदनाच्या दिवशी सोजडान येथे या नृत्याला सुरूवात होणार आह़े 2 मार्च रोजी परिसरातील विविध गावांत होत असलेल्या गेर नृत्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. अलिविहीर येथील लोकप्रिय गेर दिंडल 1951-52 मध्ये कुवरसिंग तापसिंग पाडवी यांनी सुरूवात केली होती. ही परंपरा त्यांचे नातू जगतसिंग गटवरसिंग पाडवी हे पुढे चालवत आहेत. होळीच्या 10 ते 15 दिवसाअगोदरपासून सुरु होणा:या गेर दिंडलच्या प्रशिक्षणात सहभागी होणा:या मुलांना मुली म्हणून संबोधण्यात येते. या प्रशिक्षणात पाच वर्षाच्या बालकापासून प्रौढवयीन व्यक्तीर्पयत कोणीही सहभागी होऊ शकतो.
सरावसाठी येणा:यांचा धोती आणि पगडी पेहराव असतो. हातात दिंडल घेवून बासरीच्या तालावर ते गेर दिंडलच्या नऊ चालीच्या सराव करतात. सहभागी झालेल्या युवक व प्रौढवयीन पुरूषांना सोजडान येथेच तयार करण्यात आलेल्या प्रशिक्षण स्थळी होळीर्पयत मुक्काम करावा लागणार आहे. या काळात प्रशिक्षणासाठी आलेले युवक व प्रौढ आंघोळ करत नाहीत. केवळ ते स्वत:चे ओठ आणि डोळे ओले करू शकतात. पायात चप्पल न घालणे, पाणी न ओलांडणे आदी कडक नियम त्यांना पाळावे लागतात. सोजडान येथे होळीच्या दुस:या दिवशी एकत्र जमणारे गावाचे कारभारी, प्रमुख आपापल्या गावांचे निमंत्रण घेत गेर दिंडल नृत्य सादर करण्याचे नियोजन करतात़ त्यानुसार लोकप्रिय अशा गेर दिंडन नृत्याच्या कार्यक्रमांना सुरूवात होत असते.
सोजडान येथे सुरू असलेल्या या नृत्यात प्रशिक्षण वर्गात पुजरा म्हणून प्रेमराज वर्ती, गेमु पाडवी, बासरी वादक लालसिंग पाडवी, रेसा पाडवी, मांडूल वादक म्हणून जयसिंग वळवी, नगरावादक रामसिंग नावल्या पाडवी, जवरसिंग पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली गेर दिंडलचा सराव सुरू आहे. अलिविहीर गावाचे कारभारी उमेदसिंग पाडवी, जगतसिंग पाडवी, प्रेमराज पाडवी हे दरवर्षी या प्रशिक्षणाचे आयोजन करतात.