झाडावरून पडलेल्या सविताची उपचारासाठी परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 01:31 PM2017-10-16T13:31:28+5:302017-10-16T13:31:36+5:30
मुंबई येथे दाखल : शहाद्यातील अनेकांच्या मदतीमुळे उपचार शक्य
ईश्वर पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शासकीय आरोग्य सेवेच्या गलथान कारभारामुळे आठ वर्षीय बालिका मृत्यूशी झुंज देत आह़े झाडावरून पडल्यानंतर रूग्णालयात दाखल करूनही योग्य उपचारांअभावी धडगाव तालुक्यातील आठवर्षीय सविताची परवड झाल्याने तिच्यावर कायम अपंगत्व येण्याची वेळ येऊन ठेपली आह़े
रोषमाळच्या खडकीचापाडा येथील राजा बाबल्या वळवी यांची आठ वर्षीय मुलगी सविता ही 15 दिवसांपूर्वी घराजवळील झाडावर चढून त्यावरील पाल तोडून शेळ्यांना देत होती, यादरम्यान तिचा पाय घसरून पडल्याने तिला मोठी इजा झाली़ तिचे वडील राजा वळवी यांनी तिला ‘बांबूलन्स’द्वारे तात्काळ धडगाव ग्रामीण रूग्णालयात आणले, येथे वैद्यकीय अधिक:यांनी तिच्यावर उपचार करून तिला नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यास सांगितल़े जिल्हा रूग्णालयात दाखल झाल्यानंतर आपली मुलगी पुन्हा उभी राहिल, खेळेल, बागडेल अशी स्वपAे डोळ्यात असलेल्या राजा वळवी यांचा भ्रमाचा भोपळा वैद्यकीय तज्ञांनी फोडला़ किरकोळ औषधोपचार केल्यानंतर सविता ही ठीक असल्याचे सांगून घरी पाठवून दिल़े घरी परत गेल्याच्या काही दिवसात सविता हीची प्रकृती खालावल्याने तिला पुन्हा शहादा येथे दाखल केल़े शहादा येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल केल्यानंतर मुलगी बरी होईल अशी अपेक्षा, व्यक्त होत असतानाच राजा वळवी यांच्याकडे पैसे नसल्याने डॉक्टरने बिलाची वसुली करून पुन्हा सविता हिला बाहेरचा रस्ता दाखवला, चालता न येणा:या सविताला खांद्यावर घेत, बसस्टँड परिसरात रात्र काढणा:या राजा वळवी यांची ही अवस्था शरद तिरमले या युवकास दिसून आली, त्याने शहरातील सामाजिक कार्यकत्र्याना हा प्रकार सांगितला, त्यांनी अस्थिरोग तज्ञ डॉ़ प्रशांत पाटील यांच्याकडे सविता दाखल करून देत तिच्या तपासण्या केल्या़ या तपासणीअंती पाठ आणि कमरेत ठिकठिकाणी बारीकसारीक असे असंख्य फ्रॅर झाल्याचे सांगून धुळे येथे हलवण्यास मदत केली़ तेथून जखमेचे गांभिर्य लक्षात घेता सविता हिला घाटी रूग्णालय औरंगाबाद येथे पाठवल़े
घाटी रूग्णालयात झालेल्या तपासणीनंतर आता सविता हीला केईएम रूग्णालय मुंबई येथे दाखल करण्यात आले आह़े तेथे तिच्यावर उपचार सुरू असून 15 दिवसात तिच्यावर झालेल्या उपचारांच्या हलगर्जीपणामुळे ही स्थिती उद्भवल्याचे मुंबई येथील रूग्णालय सूत्रांनी म्हटले आह़े सविता हिच्यावरचा धोका अद्यापही टळला नसल्याचे सांगण्यात येत आह़े