चिंचेची फांदी बसवर पडल्याने प्रवाशांमध्ये घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 11:32 AM2019-08-07T11:32:59+5:302019-08-07T11:33:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : हातोडा रस्त्यावरील बारलीहट्टी येथे चिंचेच्या झाडाची फांदी अचानक नंदुरबार-तळोदा बसवर पडली. परंतू बसचालकाने सावधानतेने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : हातोडा रस्त्यावरील बारलीहट्टी येथे चिंचेच्या झाडाची फांदी अचानक नंदुरबार-तळोदा बसवर पडली. परंतू बसचालकाने सावधानतेने बस थांबवल्याने मोठा अपघात टळून प्रवाशांचे जीव वाचल़े
तळोदा शहरातून जाणा:या हातोडा रस्त्याच्या दोन्ही बाजूला जीर्ण झाडे आहेत. मंगळवारी दुपारी दोन वाजेदरम्यान हातोडामार्गे एम.एच.06 एस-8750 नंदुरबार-तळोदा ही बस स्थानकातून मार्गस्थ झाली होती़ बस बारलीहट्टीजवळ गेल्यानंतर अचानक चिंचेच्या झाडाची मोठी फांदी बसवर येऊन धडकली़ मोठा आवाज झाल्याच ध्यानात आल्यानंतर चालक जे.सी. सलाम यांनी तातडीने ब्रेक मारत बस जागेवर थांबवली़ बसचा वेग अधिक असल्याने फांदी समोरच्या बाजूने आतील भागात घुसण्याचा धोका टळून प्रवाशांचे जीव वाचल़े घटनेमुळे प्रवासीही घाबरले होत़े बस थांबवून चालक व वाहक टी.के. वसावे यांनी प्रवाशांना समज देत परिसरातील नागरिकांच्या मदतीने झाडाची फांदी बसवरुन काढली व बस पुढे मार्गस्थ झाली.
दरम्यान, या परिसरात कृषी उत्पन्न बाजार समिती, आठवडे बाजार, न्यायालय, विद्यानगरी, गॅस एजन्सी, उपजिल्हा रुग्णालय, शाळा परिसर असल्याने कायम वर्दळ असते. अशा घटना केव्हाही घडू शकतात़ त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने दखल घेत कोरडय़ा झाडांची छाटणी करुन उपाययोजना करण्यात याव्यात मागणी नागरिकांकडून करण्यात आली आह़े