शेतकरी आत्महत्येवर धडगाव येथे पथनाटय़
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 11:42 AM2019-10-17T11:42:21+5:302019-10-17T11:42:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादे : कर्जबाजारी शेतकरी व दारिद्रय़ाला कंटाळलेले काही बांधव आत्महत्येचा मार्ग पत्करतात, परंतु हा या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
लहान शहादे : कर्जबाजारी शेतकरी व दारिद्रय़ाला कंटाळलेले काही बांधव आत्महत्येचा मार्ग पत्करतात, परंतु हा या समस्यांवरील उपाय नसल्याचा संदेश जिल्हा रुग्णालयाच्या कर्मचा:यांनी पथनाटय़ाच्या माध्यमातून दिला.
जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत धडगाव येथे जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. याचवेळी आत्महत्या प्रतिबंध या विषयावर पथनाटय़ सादर करण्यात आले. त्यात पथकाने आत्महत्या टाळण्याचे उपाय उपस्थितांना पटवून दिले. पथकामार्फत केवळ शेतकरीच नव्हे महाविद्यालयीन युवक - युवती यांच्यावरही ताण-तणावाबाबत यथोचित समुपदेशन करण्यात आले.
या उपक्रमासाठी डॉ.वंदना सोनोने, डॉ. विजय पवार, एस.डी. कुलकर्णी, भरत पावरा, जयंत वळवी, जामसिंग पावरा, रमश्या वसावे, करुणा चौधरी, विद्या बुंदेले, मनिष ठाकरे, शितल साळी यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील कर्मचा:यांनी परिश्रम घेतले.