बेशिस्त वाहनांमुळे रूग्णांना करावा लागतो अडचणींचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 01:02 PM2020-07-17T13:02:05+5:302020-07-17T13:02:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा उपजिल्हा रूग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर उपचारासाठी येणाऱ्या नागरीक व कर्मचारी बेशिस्तपणे वाहने उभी करीत असल्याचे ...

Patients face difficulties due to unruly vehicles | बेशिस्त वाहनांमुळे रूग्णांना करावा लागतो अडचणींचा सामना

बेशिस्त वाहनांमुळे रूग्णांना करावा लागतो अडचणींचा सामना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा उपजिल्हा रूग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर उपचारासाठी येणाऱ्या नागरीक व कर्मचारी बेशिस्तपणे वाहने उभी करीत असल्याचे चित्र आहे. प्रवेशद्वारासमोर बेशिस्तपणे पार्र्कींग करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांना शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी तळोदा, धडगाव असणाºया नागरीकांना आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी तळोदा येथे उपजिल्हा रूग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या रूग्णालयात दररोज शेकडो नागरीक वैद्यकीय सुविधेचा लाभ घेतात. त्यात शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग आहे.
उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी येणारे नागरिक हे स्वत:च्या वाहनाने, प्रामुख्याने दुचाकीने येत असतात. उपचारासाठी येणारे हे नागरीक आपली वाहने उपजिल्हा रूग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासामोरच उभी करताना दिसून येत असतात. बिनदिक्कतपणे आपली वाहने प्रवेशद्वारापुढे उभी करून ते रूग्णालयात उपचार घेणे, रूग्ण असणाºया नातेवाईकांना भेटणे व अन्य कामे करण्यासाठी येत असतात. तो पर्यत त्यांची वाहने प्रवेशद्वारासमोरच उभी असतात.
प्रवेशद्वारासमोरच वाहने उभी राहत असत असल्याने दवाखान्यात प्रवेश करताना रूग्णांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या रूग्णाला रूग्णवाहिकेत आणले तर ती रुग्णवाहिकादेखील पूर्णपणे दवाखान्यात असलेल्या स्ट्रेचरच्या मार्गापर्यत पोहचू शकणार नाही, अशी परिस्थिती नेहमी असते. एकंदरीत उपजिल्हा रूग्णालयासमोर बेशिस्तपणे उभ्या असणाºया या दुचाकीमुळे होणारी अडचण लक्षात घेता रूग्णालय प्रशासनने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Patients face difficulties due to unruly vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.