पुनर्वसन प्रक्रिया 31 जुलैर्पयत पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 04:42 PM2017-07-26T16:42:35+5:302017-07-26T16:42:35+5:30

नाशिक विभागीय आयुक्त झगडे यांनी घेतला नंदुरबार येथे सरदार सरोवर प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचा आढावा

paunaravasana-parakaraiyaa-31-jaulaairapayata-pauurana-karaa | पुनर्वसन प्रक्रिया 31 जुलैर्पयत पूर्ण करा

पुनर्वसन प्रक्रिया 31 जुलैर्पयत पूर्ण करा

Next
लाईन लोकमतनंदुरबार,दि.26 - प्रकल्पबाधितांसाठीच्या सर्व उपाययोजना येत्या 31 जुलैर्पयत पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांनी दिल्या़ नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी सरदार सरोवर प्रकल्प बाधितांच्या पुनवर्सन प्रक्रिया संदर्भातील आढावा घेतला़ बैठकीस जिल्हाधिकारी डॉ़एम़ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, अप्पर जिल्हाधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, सरदार सरोवरचे विनय गोसावी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी बी़एम़मोहन यांच्यासह विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होत़े विभागीय आयुक्त झगडे यांनी सरदार सरोवर पुनर्वसन बाधितांच्या विविध समस्या आणि पुनर्वसन प्रक्रियेबाबत चर्चा केली, घर आणि शेतीच्या मोबदल्यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या़ 31 जुलैर्पयत पुनर्वसन प्रक्रियेतील सर्व कामकाज पूर्ण करण्याचे आदेशही यावेळी त्यांनी अधिका:यांना दिले आहेत़ यादरम्यान पुनर्वसन वसाहतीतील सुविधांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून रस्ते आणि पाणी या दोन सुविधांसाठी योग्य त्या उपाययोजना तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश काढल़े आयुक्त झगडे यांनी आतार्पयतच्या पुनर्वसन प्रकियेचा आढावा घेतला़ दुपारनंतर त्यांनी काथर्दे दिगर येथील पुनर्वसन वसाहतींना भेट देऊन बाधितांसोबत चर्चा केली़

Web Title: paunaravasana-parakaraiyaa-31-jaulaairapayata-pauurana-karaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.