नवलपूर शिवारात पपईचे 700 झाडे कापून फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:19 PM2018-07-26T12:19:46+5:302018-07-26T12:19:53+5:30

Pavai 700 trees cut off at Navalpur Shiva | नवलपूर शिवारात पपईचे 700 झाडे कापून फेकले

नवलपूर शिवारात पपईचे 700 झाडे कापून फेकले

Next

शहादा तालुक्यातील नवलपूर शिवारातील पपईच्या शेतातील 700 पपईची झाडे अज्ञात माथेफिरूने कापून फेकल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. वारंवार घडणा:या घटनामुळे शेतक:यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
याबाबत असे की, ब्राम्हणपुरी, ता.शहादा येथील शेतकरी मुरलीधर गोविंद पाटील यांचे नवलपूर शिवारात शेत आहे. त्यांनी आपल्या पाच एकर क्षेत्रात पपई पिकाची लागवड केली आहे. दोन ते तीन महिन्याचे पपईचे पीक झाले असून या झाडांची उंची तीन ते चार फूटावर गेली आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास सुनील मुरलीधर पाटील हे शेतात पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना आपल्या शेतातील पपईचे एक एकर क्षेत्रामधील सुमारे 700 झाडे कापलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी कापलेली झाडे पाहताच धक्का बसला. त्यांनी आरडाओरड करत आजूबाजूच्या शेतक:यांना बोलावले. यात संबधित शेतक:यांचे सुमारे एक ते दीड लाखाचे नुकसान झाले.
एकीकडे शेतकरी नैसर्गिक लहरीपणाचा बळी ठरत असताना हाती येणारे पीक देखील माथेफिरूंच्या अशा कृत्यांमुळे शेतक:यांना याचा मोठा फटका बसत आहे. गेल्या वर्षा पासून माथेफिरूंकडून मोठय़ा प्रमाणावर परिसरातील शेतक:यांची पपई व केळीची झाडे कापून नुकसान केल्याच्या घटना घडत आहेत. गेल्या पंधरा दिवसापूर्वी सुलवाडे येथील दिलीप बन्सी पाटील यांच्या शेतातील उभे पपईची झाडे कापण्याची घटना घडली होती. तर लगेच पंधरा दिवसात दुसरी घटना घडल्यामुळे परिसरात शेतक:यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तीन दिवसा पूर्वी अज्ञान चोरटय़ांकडून गिरीधर श्रीपत पाटील यांच्या शेतातील सबमर्सिबल मोटाराची 700 फूट केबल वायर चोरी झाल्याची घटना घडली होती अशा वारंवार घडत असलेल्या घटनांचा तपास पोलीस प्रशासनाकडून लागत नसल्याने पोलीस यंत्रणेवर शेतक:यानी प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे.
 

Web Title: Pavai 700 trees cut off at Navalpur Shiva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.