अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पावणेचार कोटींची भरपाई

By मनोज शेलार | Published: January 27, 2024 06:25 PM2024-01-27T18:25:50+5:302024-01-27T18:26:28+5:30

नंदुरबार जिल्ह्यात नोव्हेंबर २०२३ मध्ये अवकाळी पाऊस झाला होता. 

Pay a compensation of Rs.54 crores to the farmers who suffered losses due to bad weather | अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पावणेचार कोटींची भरपाई

अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पावणेचार कोटींची भरपाई

नंदुरबार: जिल्ह्यात नोंव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तीन कोटी ७९ लाख २३ हजार रुपयांची नुकसानभरपाई वाटप करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या खात्यात भरपाई दिली जाणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यात नोव्हेंबर २०२३ मध्ये अवकाळी पाऊस झाला होता. या पावसात मोठ्या प्रमाणावर गहू, हरभरा, केळी, पपई, कापूस, मिरची, कांदा या पिकांचे नुकसान झाले होते. तब्बल पाच हजार ७५६ शेतकऱ्यांच्या सुमारे दोन हजार ८५१ हेक्टर आर. पेक्षा जास्त शेतजमिनीचे नुकसान झाले होते. पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर केल्यानंतर शासनाने त्यासाठी चार कोटी ९५ लाख ४३ हजार रुपये एवढे अनुदान उपलब्ध करून दिले. आतापर्यंत चार हजार ३४३ शेतकऱ्यांना तीन कोटी ७९ लाख २३ हजार २७४ रुपये ऑनलाइन प्रणालीद्वारे वितरित करण्यात आले आहेत.

Web Title: Pay a compensation of Rs.54 crores to the farmers who suffered losses due to bad weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.