नवापुरात शांतता कमिटीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:45 PM2019-09-02T12:45:36+5:302019-09-02T12:45:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पाश्र्वभूमीवर नवापुरात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. येथील पोलीस ठाणे ...

Peace committee meeting in Navapur | नवापुरात शांतता कमिटीची बैठक

नवापुरात शांतता कमिटीची बैठक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पाश्र्वभूमीवर नवापुरात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली.
येथील पोलीस ठाणे आवारात अपर पोलीस अधीधक चंद्रकांत गवळी यांच्या अध्यक्षतेखाली व उपविभागीय अधिकारी रमेश पवार, तहसीलदार सुनिता ज:हाड, जि.प.च्या माजी अध्यक्षा रजनी नाईक,  भरत गावीत, नगराध्यक्षा हेमलता              पाटील, पालिका मुख्याधिकारी            राजेंद्र शिंदे, वीज कंपनीचे सहायक अभियंता एस.बी. राजपूत उपस्थित होते.
या वेळी गवळी यांनी सण-उत्सव व इतर प्रसंग साजरे करण्यासाठी प्रशासन लोकांच्या सोयीसाठी आहे. त्यांना सुविधा उपलब्ध करुन देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. नागरिकांनीही कायद्याचा चौकटीत राहावे. जनतेच्या सहकार्याशिवाय प्रशासन कामे करु शकत नाही. गणेश मंडळांनी ऑनलाईन परवानगी घ्यावी. कायद्याचा चौकटीत राहून मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे. मिरवणुकीत गुलाल न टाकता फुले उधळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसे केल्यास त्या मंडळांचा सत्कार करु. खान्देशी पारंपरिक वाद्यांचे खास वैशिष्टय़ असल्याने त्यांचा वापर करावा. डीजेचा वापर करणा:या मंडळांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. भरत गावीत यांनी सांगली, कोल्हापूर पूरग्रस्तांना 51 हजार रुपये जाहीर केले. गणेश मंडळांकडून अपेक्षा व्यक्त करताना नव्याने नोंदणी हवे असलेल्या लहान मंडळांना पोलीस प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. कायद्याचा चौकटीत राहुन सर्व मंडळे प्रशासनाला सहकार्य करतील असे ते म्हणाले. सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना श्री दादा गणपती मंडळाकडून मंडळाचे अध्यक्ष विराज शाह, खजिनदार प्रशांत पाटील व सचिव प्रेमेंद्र पाटील यांनी बैठकीत 11 हजार रुपये रोख रक्कम तहसीलदार सुनिता ज:हाड  यांच्याकडे सुपूर्द केली. 
प्रास्ताविकात पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी नवापूरच्या गणेश उत्सवाच्या शांतताप्रिय परंपरेची माहिती दिली. गणेश मंडळ कार्यकत्र्याची बैठक घेऊन सृचना देण्यात आल्याचे व रुट मार्च करुन पाहणी करण्यात आली असून  पोलिसांनी दोन जणांवर प्रतिबंधक कारवाई केल्याची माहिती त्यांनी दिली. 
मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे व विद्युत वितरण कंपनीचे सहायक अभियंता आर.बी. राजपूत यांनी सदस्यांनी केलेल्या सूचना अंमलात आणून उपाययोजना करु, असे आश्वासित केले. किरण टिभे, शंकर दर्जी, हेमंत पाटील, सुनील पवार, रऊफ शेख, पमा सैयद, मंगेश येवले, अमृत लोहार, रवींद्र साळुंखे, राजू गावीत, गणेश वडनेरे व हसमुख पाटील यांनी सूचना मांडल्या. सूत्रसंचालन  प्रा.डॉ.आय.जी. पठाण यांनी तर आभार सहायक पोलीस निरीक्षक दिंगबर शिंपी यांनी मानले.
 

Web Title: Peace committee meeting in Navapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.